तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप पर्यंत कसे पोहोचतात हॅकर्स? एका SMS ने साधला जातो डाव

तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप पर्यंत कसे पोहोचतात हॅकर्स? एका SMS ने साधला जातो डाव

फोनचं मायक्रोफोन रेकॉर्डिंग, ई मेल, SMS, कॅमेरा, सेल डाटा, टेलिग्राम, लोकेशन, कॉन्टॅक्ट्स, फाइल्स, हिस्ट्री ब्राउजिंग, इस्टंट मेसेजिंग, कॅलेंडर रिपोर्ट, सोशल नेटवर्किंग साइट, डिव्हाइस सेंटिंग या सगळ्यापर्यंत हे स्पायवेअर पोहोचतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : इस्रायली कंपनी पिगॅसस ने एका स्पायवेअरने भारतातले पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना लक्ष्य केलं, अशी बातमी आल्याने खळबळ माजली. या कंपनीने काही व्यक्तींचे फोन हॅक करून हेरगिरी केली, असा आरोप होतोय. या बातमीनंतर भारताच्या राजकारणात एकच गदारोळ झाला.

इंडिया टुडे ने दिलेल्या बातमीनुसार, भारतातले पत्रकार, वकील आणि दिग्गज व्यक्ती हे सगळेजण हॅकिंगची शिकार झाले आहेत. यामध्ये म्हटलं आहे की, पिगॅसस नावाचं हे सॉफ्टवेअर फक्त व्हॉट्सअ‍ॅपच नाही तर फोनमधली सगळी माहिती गोळा करतं.

फोनचं मायक्रोफोन रेकॉर्डिंग, ई मेल, SMS, कॅमेरा, सेल डाटा, टेलिग्राम, लोकेशन, कॉन्टॅक्ट्स, फाइल्स, हिस्ट्री ब्राउजिंग, इस्टंट मेसेजिंग, कॅलेंडर रिपोर्ट, सोशल नेटवर्किंग साइट, डिव्हाइस सेंटिंग या सगळ्यापर्यंत हे स्पायवेअर पोहोचतं.

(हेही वाचा : SBI चा अलर्ट, 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेत जमा करा हा फॉर्म)

एका SMS ने होतं काम

हे स्पायवेअर SMS ने युजरच्या फोनमध्ये पाठवलं जातं. हा SMS अशा पद्धतीने पाठवला जातो की तुम्ही तो डाउनलोड करणारच. यानंतर हा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपची सगळी माहिती गोळा करून इस्रायलमधल्या हॅकर्सना पाठवतो.

या वादानंतर टेलिकॉम मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हॉट्सअ‍ॅपला जाब विचारला आहे. व्हॉट्स व्हॉट्सअ‍ॅपने त्यांचं उत्तर 4 नोव्हेंबरपर्यंत द्यावं, असं सांगण्यात आलं आहे.

===============================================================================================

निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच आले कॅमेऱ्यासमोर, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 07:45 PM IST

ताज्या बातम्या