मुंबई: सध्याच्या डिजिटल युगात आपल्याला अनेक गोष्ट घरबसल्या आणि एका क्लिकवर उपलब्ध होतात. यात स्मार्टफोन आणि वेगवेगळी अॅप्लिकेशन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आजकाल जीमेल, गुगल मॅप सारखी जीमेल अकाउंटवर चालणारी अनेक अॅप आपल्या फोनमध्ये हमखास असतात. पण या जीमेल अकाउंटमुळे आपल्या विषयीची वरीच माहिती त्याच्या सर्व्हरवर स्टोर होत असते. पण आपल्या मृत्यूनंतर आपल्या या जीमेल अकाउंटचं नेमकं काय होतं याचा आपण कधी विचार केला आहे का? नाही केला असेल तरीही काळजी करण्याची गरज नाही कारण आता गुगलनं तुमच्या मृत्यूनंतर किंवा तुमचं जीमेल अकाउंट आपोआप डिलिट होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पाहूयात हे कसं शक्य होऊ शकतं...
- सर्वात आधी myaccount.google.com या लिंक वर जा.
-नंतर Data & personalization या ऑप्शनवर क्लिक करा.
- त्यानंतर स्क्रोल डाऊन करून Make a plan for your account या ऑप्शनवर क्लिक करा.
- या खाली असलेल्या Start ऑप्शनवर क्लिक करा.
धमाकेदार ऑफर! फक्त 141 रुपयांत JioPhone 2 घेऊन जा घरी, जाणून घ्या अटी
तुमचं जीमेल अकाउंट डिलिट करण्यासाठी या ठीकाणी आणखी एक पर्याय दिसेल. ज्याद्वारे तुमचं अकाउंट किती काळ बंद राहिल्यानंतर कंपनी कडून ते डिलिट होणार हे तुम्हाला ठरवता येतं. start वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इनअॅक्टिव्ह मॅनेजरचं पेज दिसेल ज्यात तुम्हाला 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 18 महिने असे 4 पर्याय उपलब्ध आहेत. यातील कोणताही पर्याय तुम्ही तुमच्या सोईसुनुसार निवडू शकता. यानंतर तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार तेवढा काळ तुम्ही ते बंद ठेवल्यास तुमचं अकाउंट कंपनी कडून डिलिट केलं जातं. पण तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा कालावधी संपत आल्यावर 1 महिना अगोदर SMS किंवा मेलद्वारे तुमच्याशी संपर्क करण्यात येतो व त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू केली जाते.
बिझनेस सुरू करायचा आहे? काळजी करू नका, आता WhatsApp करणार मदत
याशिवाय याठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळच्या 10 व्यक्तींची नावं समाविष्ट करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. ज्यामुळे 10 व्यक्तींना तुमचं जीमेल अकाउंट डिलिट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. तसेच यात तुम्ही ऑटो रिप्लायचा पर्यायही निवडू शकता. ज्यामुळे तुम्हाला मेल करणाऱ्या व्यक्तीला आपोआप एक मेसेज जाईल की, तुम्ही हे अकाउंट वापरत नाही आहात. अशाप्रकारे तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही तुमचं अकाउंट डिलिट करू शकता.
Google युझरसाठी मोठी बातमी, बंद होणार सर्वात जुनी सेवा
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा