OPPO F11 Pro: हा 25,000 च्या आतील बेस्ट स्मार्टफोन का आहे..!

OPPO F11 Pro: हा 25,000 च्या आतील बेस्ट स्मार्टफोन का आहे..!

OPPO F11 Pro मध्ये एवढे जबरदस्त फीचर्स असूनही त्याची किंमत तुमच्या बजेटनुसार ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा आकर्षक स्मार्टफोन रु.२५,००० हून कमी किमतीला विकत घेऊ शकतात.

  • Share this:

तुम्हाला उत्तम कॅमेरा असलेला फोन हवा असेल, जो कमी प्रकाशातही सुंदर फोटो काढू शकेल आणि तरीही तुम्हाला ज्याच्या बॅटरीची चिंता करावी लागणार नाही तर आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम फोन सादर करत आहोत - OPPO F11 Pro

 आणि मी म्हणालो की, तुम्हाला हे सर्व फीचर्स रु. २५,००० च्या आत मिळेतील, तर तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल याची मला खात्री आहे! रु.२४,९९९ ही किंमत असलेल्या OPPO चा हा नवीन स्मार्टफोन पाहून पूर्ण इंडस्ट्रीच विस्मयचकीत झाली आहे. असे खरेच शक्य आहे का, असा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे. आम्ही OPPO F11 च्या फीचर्सची एक लिस्ट तयार केली आहे, ज्या फीचर्समुळे या फोनला युझर्स पसंत करत आहेत.

१) कॅमेरा: आजच्या काळात प्रत्येकालाच डीएसएलआर कॅमेरा आपल्या खिशात हवा आहे आणि ४८ मेगापिक्सेल असलेला OPPO F11 नेमेकी हीच गरज भागवतो. एक्सक्लुसिव्ह मॅपिंग कर्व्ह आणि पिक्सेल-ग्रेड कलर मॅपिंग अल्गॉऱ्हिदममुळे युझर्सना सुस्पष्ट आणि जिवंत फोटो मिळतात कारण OPPO चे एक्सक्लुसिव्ह एआय इंजिन आणि अल्ट्रा क्लिअर इंजिन अनेक प्रकारे फोटो ऑप्टिमाइझ करते आणि क्रिस्टल क्लिअर पोर्ट्रेट इफेक्ट प्राप्त होतो.

या फोनचा मोटराइझ्ड कॅमेरा अधिक लवकर फोकस करतो आणि फोटो उजळ आणि स्पष्ट येतात. फोटो दिवसा काढलेले असोत वा रात्री त्यांचा दर्जा उत्तमच असतो. १६ मेगा पिक्सेलच्या सेन्सर कॅमेऱ्यासह फोनच्या स्क्रीन फ्लॅश फंक्शनॅलिटीमुळे तुम्हाला कमी प्रकाशातही उत्तम फोटो मिळतात. मधोमध लावलेला रायझिंग कॅमेरा इमेजची क्वालिटी खराब होण्यापासून वाचवतो आणि सेल्फी नॅचरल दिसायला मदत करतो. त्याचप्रमाणे फ्रंट कॅमेरा राउंडेड आहे आणि त्याच्या कर्व्ह डिझाइनमुळे फोन उठून दिसतो. OPPO हा इंडस्ट्रीमधला पहिला ब्रँड आहे ज्याने नॅनो प्रिंटिंग टेक्निकचा वापर केला आहे आणि इंक-वॉश पेंटिंगचा इफेक्ट साधला आहे.या फोनमध्ये अत्यंत चर्चिला जाणारा पोर्ट्रेट मोड आहे, जो तुमच्या फोटोंना एक प्रोफेशनल टच देतो. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या फोनमधले ब्युटी फीचर वापरून फोटो अधिक सुंदर करू शकता आणि सोशल मीडियावर चर्चेत राहू शकता.

२) बॅटरी लाईफ: आजच्या वेगवान जगात, जेव्हा तुमच्याकडे वेळ खूप कमी असतो आणि त्या वेळात तुम्हाला खूप काही करायचे असते, तेव्हा तुमच्या फोनची बॅटरी संपू नये ही तुमची अपेक्षा असते. वेगवान डाऊनलोड आणि कमी वेळेत होणारे चार्जिंग यामुळे OPPO F11 स्मार्ट फोन तुम्हाला अधिक एंटरटेनमेंट टाईम देतो. या फोनमध्ये ४००० mAh क्षमतेची मोठी आणि अधिक चांगली बॅटरी आहे आणि VOOC ३.० टेक्नॉलॉजीच्या इंटिग्रेशनसह फास्ट रिचार्जची सुविधा मिळते. जेव्हा आम्ही कॅमेरा वापरला तेव्हा आमच्या निरीक्षणानुसार OPPO F11 ने १५.५ तासांचे बॅटरी लाईफ, १२ तासांचे व्हिडियो वॉचिंग, ५.५ तासांचा गेम प्लेइंग टाइम आणि १२ तासांच्या अखंडीत म्युझिक लिसनिंगची बॅटरी लाईफ मिळते, ज्यामुळे हा फोन अधिक प्रभावशाली होतो.

३) गेमिंग एक्सपिरिअन्स: आधुनिक ऑक्टा-कोअर हेलिओ P70 चिपसेट गेम लव्हर्सना सर्वोत्तम सेट अप देतो, ज्याने ते अगदी सहजपणे कोणत्याही अडथळ्याविना PUBG सारखे कोणतेही हाय एंड गेम्स खेळू शकतात. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह याची हिट मॅनेजमेंट सिस्टिम कोणत्याही अडथळ्याविना दीर्घ काळ गेमिंग सेशन्स सुरू ठेवेते आणि अनेक तास खेळल्यानंतरही फोन गरम होणार नाही, याची खातरजमा ही सिस्टिम करते.

४) डिझाइन: २५,००० रुपयांहून कमी किमतीमध्ये या फोनचे आकर्षक रूप आणि प्रीमिअम फिनिश म्हणजे एक सरप्राईझच आहे. याचे लुक्स आकर्षक आहेतच, त्याचबरोबर त्याची ग्रिपसुद्धा घटट् आहे. हा फोन ऑरोरा ग्रीन आणि थंडर ब्लॅक या दोन वैशिष्ट्यपूर्ण रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे, जे दिसायला अत्यंत स्टायलिश आहेत.

OPPO F11 Pro मध्ये ६.५ इंचांचा डिस्प्ले मिळतो आणि याच्या रायझिंग कॅमेऱ्यामुळे तुम्हाला ९०.९% बॉडी टू स्क्रीन रेशो मिळतो, त्याचप्रमाणे हा कॅमेरा तुम्हाला पूर्ण HD कंटेन्ट पाहण्याचा अनुभव देतो. यात IPS LCD पॅनल आहे जे १०८० X २३४० रिसोल्युशनमध्ये व्हिज्युअल्स दाखवते.

५) एआय आणि फीचर्स: पॉवरफुल क्लाउड सर्व्हिस पॅकेज, ड्रॉवर मोड, सिंपल नॅव्हिगेशन सिग्नल्स, स्मार्ट रायडिंग मोड आणि एफिशिअंट स्मार्ट असिस्टंट या फीचर्सबरोबरच OPPO F11 Pro मध्ये बिल्ट-इन AI (आर्टिफिशिअ इंटेलिजन्स) देण्यात आले आहे जे मेमरी मॅनेजमेंट वाढविण्यासाठी बॅकग्राउंड अॅपना फ्रीझ करते. युझरना त्यांचे कॉन्टॅक्ट्स आणि फोटो डीलिट करावे लागू नयेत, याची खातरजमा वाढीव क्लाउड स्टोरेज करते.

या शिवाय फोटो-सिन्क, व्हिडियो-सिन्क, अल्बम शेअरिंग, बुकमार्क सिन्क, न्यूज सिन्क (फक्त भारत), कॉल रेकॉर्डिंग सिन्क, WIFI की सिन्क, SMS बॅकअप आणि रिस्टोअर, जनरल सिस्टिम सेटिंग्ज बॅकअप आणि रिस्टोअर, कॉल हिस्टरी बॅकअप आणि रिस्टोअर या क्लाउड सर्व्हिसेस दिल्या जातात.

युझर्सनना अनावश्यक प्रमोशन्स आणि जाहिरातीचे नोटिफिकेशन्स पाहावे लागू नयेत यासाठी OPPO F11 Pro मध्ये OPUSH अॅक्सेस रुल्स आणि अँड्रॉइड नेटिव्ह नोटिफिकेशन्स प्रायोरिटीज वापरण्यात येतात, जेणेकरून लो-प्रायॉरिटी नोटिफिकेशन्स आपोआप कोलॅप्स होतात.

OPPO F11 Pro चे स्मार्ट ड्युअल चॅनल नेटवर्क स्मार्ट अँटेना अल्गॉऱ्हिदमचा (अप अँड डाऊन स्विचिंग, लेफ्ट अँड राइट स्विचिंग, लँडस्केप अँड पोर्ट्रेट स्विचिंग इत्यादी) वापर करून वीक सिग्नलची समस्या सोडवते आणि अखंडित नेटवर्क उपलब्ध करून देते.

६) पॉकेट फ्रेंडली किंमत: OPPO F11 Pro मध्ये एवढे जबरदस्त फीचर्स असूनही त्याची किंमत तुमच्या बजेटनुसार ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा आकर्षक स्मार्टफोन रु.२५,००० हून कमी किमतीला विकत घेऊ शकतात. प्रीमिअम डिझाइन, ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, मोटराइझ्ड रायझिंग कॅमेरा, दीर्घकाळ चालणारी बॅटरी यामुळे OPPO F11 Pro हा २५,०००च्या आत मिळणारा बेस्ट स्मार्टफोन आहे, यात काहीच शंका नाही.

या स्मार्ट फोनसह खिशाला फार चाट न देता मिळवा लक्झरी हाय ग्रेड अनुभव.

First published: April 10, 2019, 6:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading