मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /काय आहे Wi-Fi Calling, पाहा याचे फायदे; फोनमध्ये अशी करता येईल सेटिंग

काय आहे Wi-Fi Calling, पाहा याचे फायदे; फोनमध्ये अशी करता येईल सेटिंग

जेव्हा तुमचा फोन मोबाइल नेटवर्कवरून (Mobile Network) कॉल करताना कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वाय-फाय वापरतो, त्याला वाय-फाय कॉलिंग म्हणतात.

जेव्हा तुमचा फोन मोबाइल नेटवर्कवरून (Mobile Network) कॉल करताना कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वाय-फाय वापरतो, त्याला वाय-फाय कॉलिंग म्हणतात.

जेव्हा तुमचा फोन मोबाइल नेटवर्कवरून (Mobile Network) कॉल करताना कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वाय-फाय वापरतो, त्याला वाय-फाय कॉलिंग म्हणतात.

    नवी दिल्ली, 22 एप्रिल : ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी (Connectivity) कमी किंवा खराब असते अशा ठिकाणी वाय-फाय कॉलिंग (Wi-Fi Calling) केलं जातं. म्हणजेच जेव्हा तुमचा फोन मोबाइल नेटवर्कवरून (Mobile Network) कॉल करताना कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वाय-फाय वापरतो, त्याला वाय-फाय कॉलिंग म्हणतात. तुमचा टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर (Telecom Provider) वाय-फाय कॉलिंगची सुविधा प्रदान करतो. ही सुविधा कॉल क्लियर आणि इझी करण्याचं काम करते. एअरटेल (Airtel), जिओ (Jio) आणि वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) सारख्या भारतातील सर्व प्रमुख टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) आपल्या ग्राहकांना वाय-फाय कॉलिंगची सुविधा देतात. या सुविधेमुळे तुम्ही दुसऱ्या देशात असलेल्या आणि दुसरं नेटवर्क वापरणाऱ्या व्यक्तीसोबत सहज संवाद साधू शकता. हे फीचर आता सामान्य झालं असल्यानं, ते नेमकं कसं काम करतं याबाबत लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे.

    वाय-फाय कॉलिंग म्हणजे काय?

    सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, वाय-फाय कॉलिंग ही एक सुविधा आहे. ज्यामध्ये युजर्सना मोबाइल डेटाच्या बदल्यात वाय-फाय कनेक्शनवर (Wi-Fi Connection) कॉल व मेसेज पाठवता आणि घेता येतात. विशेषतः खराब कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी ही सुविधा फार प्रभावी ठरते आहे. तुमचा स्मार्टफोन टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कऐवजी कॉल करण्यासाठी वाय-फाय नेटवर्क वापरतो. सहसा वाय-फाय कॉलिंगची सुविधा टेलिकॉम प्रोव्हायडरकडून ऑटोमॅटिकली अॅक्टिव्ह केली जाते. वाय-फाय कॉलिंग अॅक्टिव्ह करण्यासाठी युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) सहसा काहीही बदल करण्याची आवश्यकता नसते.

    वाय-फाय कॉलिंगसाठी जास्त डेटा खर्च होतो का?

    वाय-फाय कॉलिंगसाठी डेटा (Data) वापरला जातो, हे समजल्यानंतर वाय-फाय कॉलिंगमध्ये सामान्य कॉलिंगपेक्षा जास्त डेटा किंवा बॅटरी (Battery) खर्च होते का? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आहे. वाय-फाय कॉलिंग हे फिचर कॉल करण्यासाठी केवळ तुमचं वाय-फाय नेटवर्क वापरतं. मोबाइल डेटाचा वापर होत नाही. एअरटेलच्या मते, पाच मिनिटांच्या वाय-फाय कॉलसाठी सुमारे 5MB डेटा वापरला जातो. सामान्य कॉल्ससाठी जितकी बॅटरी लागते तितकीच बॅटरी वाय-फाय कॉलिंगसाठी खर्च होते.

    हे वाचा - UIDAI Update: काय आहे मास्क्ड आधार? कसं कराल डाउनलोड, पाहा याचे फायदे

    किती खर्च लागतो?

    तुमच्या टेलिकॉम प्रोव्हायडरकडे ही वाय-फाय कॉलिंगची सुविधा असल्यास ती आपोआप अॅक्टिव्ह होते. ही एक विनामूल्य सेवा (Free Service) आहे. त्यामुळं युजर्सला वाय-फाय कॉलिंगसाठी कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागत नाहीत. तुमच्या नेटवर्क प्रोव्हायडरकडे वाय-फाय कॉलिंग सर्व्हिस आहे की नाही हे तपासण्यासाठी, तुमच्या स्मार्टफोन सेटिंग्जमध्ये जावं लागेल. अँड्रॉईड युजर्सनी, सेटिंग्ज > मोबाइल नेटवर्क किंवा कनेक्शन > वाय-फाय या सेटिंग्जमध्ये जावं. तिथे वाय-फाय कॉलिंग दिसत आहे की नाही हे चेक करावं.

    आयफोन युजर्सनी, सेटिंग्ज > फोन > मोबाइल डेटा > वाय-फाय कॉलिंग या सेटिंग्जमध्ये जावं. तुमचा टेलिकॉम प्रोव्हायडर जर वाय-फाय कॉलिंगला सपोर्ट करत असेल तरच तिथे वाय-फाय कॉलिंगचा ऑप्शन दिसेल.

    First published:

    Tags: Smartphone, Tech news