मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /काय आहे Twitter Blue? युजर्सला Tweet करताना मिळतील हे जबरदस्त फायदे

काय आहे Twitter Blue? युजर्सला Tweet करताना मिळतील हे जबरदस्त फायदे

कंपनीनं 'ट्विटर ब्लू' (Twitter Blue) हे प्रीमियम सबस्क्रिप्शन सुरू केलं आहे. यामुळे तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळू शकतो.

कंपनीनं 'ट्विटर ब्लू' (Twitter Blue) हे प्रीमियम सबस्क्रिप्शन सुरू केलं आहे. यामुळे तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळू शकतो.

कंपनीनं 'ट्विटर ब्लू' (Twitter Blue) हे प्रीमियम सबस्क्रिप्शन सुरू केलं आहे. यामुळे तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळू शकतो.

    नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : अनेकांची सोशल मीडियावर (social media) अकाउंट्स असतात. अनेक जण दिवसातला बराचसा वेळ विविध सोशल मीडिया साइट्सवर घालवतात. WhatsApp, Instagram आणि Twitter सारख्या सोशल मीडिया साइट्सवर आपलं अकाउंट सुरू करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क मोजावं लागत नाही, मात्र Twitter च्या बाबतीत ही परिस्थिती आता बदलणार आहे. लवकरच ट्विटर सेवांचा पूर्णपणे लाभ घेण्यासाठी थोडे पैसे खर्च करावे लागणार आहेत. कंपनीनं 'ट्विटर ब्लू' (Twitter Blue) हे प्रीमियम सबस्क्रिप्शन सुरू केलं आहे. यामुळे तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळू शकतो. जे युजर्स (Twitter User) उत्कृष्ट आर्टिकल्स शोधण्यासाठी आणि न्यूज स्टोरीजचा आढावा घेण्यासाठी ट्विटरचा वापर करतात, अशांसाठी ही बाब फायदेशीर ठरेल.

    सुरुवातीला ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये 'ट्विटर ब्लू'ची चाचणी घेण्यात आली होती. तिथल्या दीर्घ चाचणीनंतर आता हे फीचर अमेरिका आणि न्यूझीलंडच्या सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. ट्विटर ब्लूची काही महत्त्वाची फीचर्स आणि साइन-अप करण्याची माहिती इथे देत आहोत.

    ब्लू ट्विटर फीचरमुळे अगदी सहजरीत्या ट्वीट सेंड (send) आणि रीड (read) करता येतात. तुम्ही एखादं ट्विट केलं आणि नंतर तुम्हाला त्यात छोटीशी स्पेलिंग मिस्टेक आढळली, तर ट्विटर ब्लू तुम्हाला ती दुरुस्त करण्यास मदत करेल. जेव्हा तुम्ही ट्वीटवर 'सेंड' बटण दाबता तेव्हा तुम्हाला ट्वीट अनडू (Undo) करण्यासाठी काही सेकंद मिळतात, जेणेकरून तुम्ही चुका टाळू शकता. याव्यतिरिक्त, आयओएस (iOS) आणि डेस्कटॉप युजर्स आता वॉशिंग्टन पोस्ट (Washington Post), द अटलांटिक (The Atlantic) आणि इनसायडरचे लेख जाहिरातींच्या अडथळ्याशिवाय वाचू शकतात. कारण, ट्विटर ब्लूच्या सब्सक्रिप्शनमधून मिळालेले काही पैसे या प्रकाशकांना दिले जातात.

    PHOTO: धुळ्यातील व्यक्तीच्या खिशातच फुटला OnePlus Nord 2, झाली भयंकर अवस्था

    ट्विटर ब्लूसाठी साइन अप (Sign up) करण्याचे टप्पे -

    अमेरिकेमध्ये ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनसाठी प्रत्येक महिन्याला 2.99 डॉलर्स खर्च करावे लागत आहेत. सबस्क्रिप्शन घेतलेले युजर्स आयफोन अॅप, अँड्रॉइड अॅप किंवा डेस्कटॉप वेबसाइटवरून लॉगिन करू शकतात.

    सर्वांत अगोदर ट्विटर ओपन करा आणि स्वत:च्या अकाउंटमध्ये लॉगइन करा.

    स्मार्टफोन अॅप युजर्सनी प्रोफाइल फोटोवर क्लिक करा आणि डेस्कटॉप साइटवर डाव्या बाजूच्या बारवरच्या More ऑप्शनवर जा.

    त्या ठिकाणी ट्विटर ब्लू (Twitter Blue) ऑप्शन सिलेक्ट करावा.

    तिथे '2.99 डॉलर्स प्रतिमहिना सदस्यत्व' या ऑप्शनवर क्लिक करा आणि पेमेंटची माहिती एंटर करा. तुम्ही अॅपल युजर असाल, तर तुमचा अॅपल आयडी किंवा गुगल पे वापरून देखील पेमेंट करू शकता.

    पेमेंट झाल्यानंतर पुन्हा एकदा ट्विटरवर जा. तिथे तुम्हाला तुम्ही ट्विटर ब्लूमध्ये लॉगइन केलं असल्याचं दिसेल.

    First published:
    top videos

      Tags: Twitter, Twitter account