मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

FASTag बद्दल तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का? अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

FASTag बद्दल तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का? अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

Explained :  येत्या 1 जानेवारीपासून हायवेवरून प्रवासासाठी FASTag बंधनकारक केला आहे, जाणून घ्या त्याविषयी सर्वकाही

Explained : येत्या 1 जानेवारीपासून हायवेवरून प्रवासासाठी FASTag बंधनकारक केला आहे, जाणून घ्या त्याविषयी सर्वकाही

Explained : येत्या 1 जानेवारीपासून हायवेवरून प्रवासासाठी FASTag बंधनकारक केला आहे, जाणून घ्या त्याविषयी सर्वकाही

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 28 डिसेंबर : भारतातील कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना (Highway) तुम्हाला एखादा टोल प्लाझा ओलांडावा लागणार असेल तर 1 जानेवारी 2020 पासून तुमच्या कारला FASTag चं स्टिकर लावून घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. स्पर्शविरहित आणि डिजिटल पेमेंट पद्धतीतून टोल भरण्यासाठी देशातील सर्व टोल नाक्यांवर वाहनावर FASTag लावलेला असणं 1 जानेवारी 2020 पासून बंधनकारक करण्यात आलं आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसंच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच दिली. सरकारने गेल्या वर्षीही ही योजना लागू करण्यावर जोर दिला होता आणि तेव्हाच 2020 साठी मुदतवाढ दिली होती. सध्या HDFC Bank, Axis Bank, ICICI Bank, Kotak Bank, Paytm Payments Bank and IDFC First Bank, यांच्यासह अनेक बँका FASTag उपलब्ध करून देत आहेत. आणि हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे की देशभरातील महामार्गांवर असणाऱ्या 720 टोलनाक्यांवर FASTag यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

FASTag हे काय आहे?

NETC, किंवा National Electronic Toll Collection ने National Payments Corporation of India (NPCI) सोबत विकसित केलेल्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स सिस्टिमच्या माध्यमातून वाहनाला टोलनाक्यावर थांबावं न लागता गाडीवरील FASTag चं स्कॅनिंग केलं जाईल आणि तिचा टोल ऑटोमॅटिक पद्धतीने सरकारकडे जमा केला जाईल. यासाठी RFID तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. कारच्या आतून विंडशिल्डजवळ हे FASTag चं स्टिकर तुमच्या कारला लावलं जाईल. FASTag वर असलेल्या बारकोडमध्ये वाहनाची सर्व माहिती साठवलेली असेल ती Radio-frequency Identification (RFID) च्या माध्यमातून स्कॅन केली जाईल. तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर FASTag साठी वेगळ्या रांगा असतील तिथं वर FASTag रीडर बसवले असतील आणि त्या खालून तुम्ही वाहन घेऊन गेलात की तुमच्या कारवरील FASTag मधून तुमच्या कारची माहिती स्कॅन होईल व तुम्हाला लागू असलेली टोलची रक्कम तुमच्या प्रीपेड खात्यातून सरकारी खात्यात जमा केली जाईल. हे सगळं करताना तुम्हाला तुमचं वाहन थांबवावं लागणार नाही, कुणाशी बोलावं लागणार नाही की रोख रक्कम द्यावी लागणार नाही.

FASTag चा फायदा काय?

National Highways Fee (Determination of Rates and Collection) Rules 2008, नुसार टोलनाक्यांवर FASTag असलेल्या वाहनांनासाठी स्वतंत्र रांग असेल त्यातून तुम्ही पटकन जाऊ शकाल त्यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे हा सर्वांत मोठा फायदा आहे. दुसरा फायदा म्हणजे चालकांना कोणताच रोख व्यवहार करावा लागणार नाही आणि त्यामुळेच टोल नाक्यावरील व्यवहार पारदर्शक होतील. टोलच्या रकमेबद्दल वाद घालणं, सुटे पैसे शोधत बसणं यासारखे प्रकार रोख टोल देण्यामुळे होतात आणि नाक्यावर मोठ्या रांगा लागतात. ते टाळणं या FASTag मुळे शक्य होईल. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला टोलवर अधिक काळ थांबावं लागलं नाही तर तुमच्या गाडीचं इंधन कमी जळेल आणि पर्यायाने प्रदूषण कमी होईल.

मी FASTag कसा विकत घेऊ?

FASTag विकत घ्यायला अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

1)कारच्या नोंदणीची कागदपत्र आणि तुमचं ओळखपत्रसोबत असेल तर तुम्ही थेट टोल नाक्यावर FASTag विकत घेऊ शकता.

2) या प्रक्रियेत KYC पूर्ण करणं गरजेचं आहे.

3) तुम्ही Amazon.in किंवा तुम्ही विविध बँका, पेमेंट्स बँका (payments banks) यांच्या माध्यमातूनही FASTags विकत घेऊ शकता. सध्या FASTags उपलब्ध करून देणाऱ्या बँकांमध्ये HDFC Bank, ICICI Bank, State Bank of India, Kotak Bank, Axis Bank, Paytm Payments Bank आणि काही बँकांचा समावेश आहे.

FASTag ची किंमत काय?

FASTag ची किंमत दोन गोष्टींवर अवलंबून आहे. एक, तुमचं वाहन कुठल्या प्रकारचं आहे कार, जीप, व्हॅन, व्यावसायिक इ. दुसरं म्हणजे तुम्ही ज्या बँकेकडून FASTag घेताय त्यांचे टॅग देणं आणि सिक्युरिटी डिपॉझिटसंबंधी जे नियम आहेत ते. आता Paytm वर FASTag ची किंमत 500 असून त्यात 250 रुपयांचं रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिटचा समावेश असून खात्यात किमान 150 रुपये बाकी ठेवणं बंधनकारक आहे. तुम्ही FASTag आयसीआयसी बँकेकडून घेतलात तर 99.12 रुपये टॅग देण्याचं शुल्क आणि 200 रुपये डिपॉझिट आणि 200 रुपये मिनियम थ्रेशोल्ड बॅलन्स भरावा लागेल. FASTag च्या किमतींत थोडेफार बदल आहेत पण बँका त्यासोबत कॅशबॅक व इतर ऑफर्सही देत आहेत.

FASTag कसं रिचार्ज करायचं?

सोप्पयं, एक म्हणजे बँकेने तुमचं FASTag वॉलेट तयार केलं असेल आणि ते तुम्ही internet banking, credit or debit cards or UPI च्या माध्यमातून रिचार्ज करू शकता. दुसरं जर तुमच्याकडे Paytm व PhonePe सारखी मोबाइल वॉलेट असतील तर त्यातुनही हे पैसे भरता येऊ शकतात.

FASTag ची मुदत किती?

FASTag मिळाल्याच्या तारखेपासून 5 वर्ष त्याची मुदत आहे. तुम्ही FASTag अकाउंटमध्ये भरलेले पैसे पाच वर्षं वापरू शकता त्या अकाउंटला मुदत नाही.

First published: