• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • Digital Signature म्हणजे काय; ती कशी जनरेट करावी, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Digital Signature म्हणजे काय; ती कशी जनरेट करावी, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

कार्यालयीन कामकाजासाठी सिग्नेचर किंवा स्वाक्षरी डिजीटल झाली आहे. ही डिजीटल स्वाक्षरी (Digital Signature) कशी करावी, त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते, जाणून घ्या.

  • Share this:
नवी दिल्ली, 11 जून: आजच्या डिजीटल युगात प्रत्येक गोष्ट डिजीटली करण्याकडे कल वाढत आहे. ऑफिशियल कामं देखील याला अपवाद राहिलेली नाही. डिजीटल तंत्राचा वापर कार्यालयीन कामकाजामध्ये लक्षणीय वाढला आहे. डॉक्युमेंटेशन, प्रेझेंटेशन, डेटा स्टोअरेज अशी कामं डिजीटल तंत्राच्या सहाय्याने केली जात आहेत. त्यातच आता कार्यालयीन कामकाजासाठी सिग्नेचर किंवा स्वाक्षरी ही देखील डिजीटल झाली आहे. ही डिजीटल स्वाक्षरी (Digital Signature) कशी करावी, त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागते, जाणून घ्या. डिजीटल स्वाक्षरी म्हणजे काय? झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षरातील सहीचं इलेक्ट्रॉनिक रुप म्हणजे डिजीटल स्वाक्षरी. कागदपत्र प्रमाणिकृत करण्यासाठी या स्वाक्षरीचा वापर केला जाऊ शकतो. ही डिजीटल प्रमाणपत्र कंट्रोलर ऑफ सर्टिफाईंग अथॉरिटी तर्फे स्वीकृत सर्टिफाईंग अथॉरिटी जारी करते. हे डिजीटल प्रमाणपत्र यूएसबी टोकन (USB Token) स्वरुपात असतं आणि ते सर्वसामान्यपणे 1 ते 2 वर्षांसाठी वैध असतं. वैध कालावधी संपल्यानंतर हे प्रमाणपत्र रिन्यू करावं लागतं. डिजीटल स्वाक्षरी (Digital Signature) रजिस्टर कशी करावी? डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्र हे आयकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकृत वेबसाईटवर रजिस्टर करावं लागतं. व्यक्तीची योग्य ओळख पटण्यासाठी ही प्रक्रिया गरजेची असते. डिजीटल स्वाक्षरी रजिस्टर करण्याची प्रक्रिया - - www.incomtaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जा. त्यानंतर रजिस्टर पॅन किंवा पासवर्ड वापरुन लॉगइन (Log In) करा. - लॉगइन केल्यानंतर मेन मेनूमधून प्रोफाईल सेटिंग्जवर जा. त्यानंतर रजिस्टर डिजीटल स्वाक्षरी सर्टिफिकेटवर क्लिक करा. - लॅडींग पेजवर दिल्या गेलेल्या लिंक वरुन डिएससी मॅनेजमेंट युटीलिटी डाऊनलोड करावी लागेल. झिप फोल्डर मधून (Zip Folder) बाहेर काढून डिएससी मॅनेजमेंट युटीलिटी ओपन करा. - डिएससी मॅनेजमेंट युटीलिटीत डिजीटल स्वाक्षरीचा वापर करत दुसरा टॅब रजिस्टर/रिसेट पासवर्डमध्ये जावं लागेल. - कॉम्प्युटर/लॅपटॉपच्या यूएसबी पोर्टमध्ये डिएससी यूएसबी टोकन लावा. - ई-फायलिंगमध्ये नोंदणी केलेला युजर आयडी आणि पॅन नंबर टाका. - डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्राची निवड करा आणि स्वाक्षरी फाईल जनरेट करा. - पुन्हा ई-फायलिंग पोर्टलवर (E-Filing Portal) जा आणि रजिस्टर डिजीटल स्वाक्षरी सर्टिफिकेटच्या पेजवर जनरेट केलेली स्वाक्षरी फाईल अटॅच करा. आणि ती सबमिट करा. - डिएससीचे रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेल तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठवला जाईल. तुमची त्वचा पाहूनच सांगेल काय आहे समस्या; Google चं भन्नाट हेल्थ टूल डिजीटल स्वाक्षरीसह आयकर रिटर्नच्या व्हेरिफिकेशन (Verification) प्रक्रियेचा हा पहिला टप्पा होता. एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुढील टप्पा हा आयटीआर व्हेरिफिकेशनचा असतो. या व्हेरिफिकेशनच्या स्टेप्स - - ई-फायलिंग पोर्टलमधून नवीन डिसीएस मॅनेजमेंट युटीलिटी डाऊनलोड करा. झिप फोल्डरमधून बाहेर काढत युटीलिटी ओपन करा. - तिसरा टॅब एक्सएमएल सिलेक्ट करा. त्यानंतर एक्सेल किंवा जावा रिटर्न फायलिंग युटीलिटीमधून जनरेट केलेली एक्सएमएल फाईल ब्राऊज करा. जर रिटर्न ऑनलाईन ई-फायलिंग अकाऊंटमधून तयार केलं जात असेल, तर चौथा टॅब सबमिट आयटीआर/फॉर्म ऑनलाईनचा वापर करा. - डिसीएसचा (यूएसबी टोकन) प्रकार निवडा आणि सिग्नेचर फाईल जनरेट करा. - ई-फायलिंग वेबसाईटवर परत जा. आयटीआर एक्सएमएल फाईल (XML File) अपलोड करताना डिजीटल स्वाक्षरी सर्टिफिकेटच्या रेडीओ बटणची निवड करा. - ई-फायलिंगवेळी एक्सएमएल फाईल सोबत सिग्नेचर अपलोड करा. Googleने आपल्याच CEOच्या वाढदिवसाच्या तारखेत केला गोंधळ;सर्चमध्ये 2 तारखा समोर डिजीटल स्वाक्षरी 3 प्रकारांमध्ये उपलब्ध असते - - ही व्यक्तिगत उपयोगासाठी जारी केली जाते. कमी किंमतीच्या व्यवहारासाठी याचा वापर केला जातो. यासाठी ओळखीचा पुरावा लागत नाही. - ही डिजीटल स्वाक्षरी विविध सरकारी संस्थांमध्ये कागदपत्र दाखल करण्यासाठी वापरली जाते. आयकर विभाग, कॉर्पोरेट संबंधित मंत्रालये आदी. आयकर रिटर्नसाठी याच सिग्नेचरचा वापर केला जातो. - याचा वापर रेल्वे, बॅंका, रस्ते परिवाहन प्राधिकरण, वीज कार्यालयासारख्या सरकारी विभागांमध्ये ई-टेंडरिंगच्या वेळी केला जातो.
Published by:Karishma Bhurke
First published: