नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : प्रत्येक भारतीय नागरिसासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सरकारी-खासगी कामं, शाळा-कॉलेज, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वच ठिकाणी आधार कार्ड द्यावं लागतं. त्यामुळे आधार कार्ड युजर्सला, आपल्या आधार कार्डचं ऑथेंटिकेशन (Aadhaar Card Authentication) करणं आवश्यक आहे.
आधार ऑथेंटिकेशन एक अशी प्रोसेस आहे, ज्याद्वारे आपल्या आधार नंबरसह आपली डेमॉग्राफिक माहिती नाव, जन्मतारीख, लिंग आणि फिंगरप्रिंटसारखी बायोमेट्रिक माहिती UIDAI च्या सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपोजिटरीमध्ये (CIDR) जमा होते. इथे UIDAI तुमच्या माहितीला वेरिफाय करतं.
विविध सरकारी योजना आणि प्रायव्हेट सर्विस प्रोव्हायडर्स स्किम जसं, बँक आणि टेलिकॉम ऑपरेटर आपले कस्टमर्स आणि युजर्स वेरिफाय करण्यासाठी आधार ऑथेंटिकेशन प्रोसेसचा वापर करतात. आधार ऑथेंटिकेशन सर्वसाधारणपणे सर्विसच्या डिलीव्हरी किंवा रजिस्ट्रेशनवेळी केलं जातं. आधार ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून आपली ओळख त्वरित सिद्ध करता येते. त्यामुळेच आधार नंबर महत्त्वाचा असून कोणत्याही इतर आयडी प्रूफची गरज भासत नाही.
तुमच्या आधारचंच ऑथेंटिकेशन केलं असल्याचं कसं समजलं?
UIDAI तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर ऑथेंटिकेशनची सूचना देतं. प्रत्येकवेळी UIDAI ला कोणत्याही आधारसाठी बायोमेट्रिक किंवा ओटीपी आधारित ऑथेंटिकेशनसाठी रिक्वेस्ट मिळाल्यास, ते तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवर एक सूचना देतात. त्यामुळे आपलंच ऑथेंटिकेशन होत असल्याचं समजू शकतं.
तसंच, जर फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन फेल झालं, तर स्कॅनरवर पुन्हा एकदा योग्यरित्या बोट ठेवून फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन करता येतं. जर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सतत फेल होत असेल, तर आधार सेंटरवर संपर्क करुन UIDAI सह तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aadhar card, M aadhar card, Tech news