मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

AC चा कॉम्प्रेसर नेमकं काय काम करतो? तो खराब कसा होतो? जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

AC चा कॉम्प्रेसर नेमकं काय काम करतो? तो खराब कसा होतो? जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

एसीचा कॉम्प्रेसर साधारणतः 10 ते 12 वर्षं टिकतो. त्यापूर्वीच जर तुमच्या एसीतील कॉम्प्रेसरमध्ये काही बिघाड झाला असेल, तर मेकॅनिकला दाखवणं आवश्यक आहे. तुम्ही स्वतः दुरुस्त करण्याचा प्रयत्नही करू नका.

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : एअर कंडिशनर (Air Conditioner) वापरायलाच लागेल, असा सध्याचा हंगाम नाही. पण एसीबद्दलच्या (AC) काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. अनेकदा एसीचा कॉम्प्रेसर (Compressor) काम करत नाहीये किंवा तो बंद पडल्यामुळे मेकॅनिकला बोलवावं लागतं. पण एसीमध्ये कॉम्प्रेसरचं काम नेमकं काय असतं?

कॉम्प्रेसर म्हणजे नेमकं काय असतं?

कॉम्प्रेसर (Compressor) हा एसी अर्थात एअर कंडिशनरचा (Air Conditioner) सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. ते एक प्रकारचं मेकॅनिकल डिव्हाइस (Mechanical Device) असून, त्याचा उपयोग हवेचा दाब (Air Pressure) वाढवण्यासाठी केला जातो. कॉम्प्रेसरचा वापर करून हवेचं प्रमाण कमी करून त्याच्यावरचा दाब वाढवला जातो. कॉम्प्रेसरचा वापर फ्रीजमध्येही केला जातो.

एसी कशा प्रकारे काम करतो?

एसीच्या इव्हॅपोरेटरमधून (Evaporator) रेफ्रिजरंट (Refrigerant) अर्थात हवा थंड करणारा पदार्थ बाहेर पडतो, तेव्हा तो कमी दाब असलेल्या वायूत रूपांतरित होतो. आजूबाजूची उष्णता रेफ्रिजरंट स्वतःमध्ये शोषून घेतो. ती उष्णता बाहेर सोडून देण्यासाठी रेफ्रिजरंटला जास्त तापमान आणि जास्त दाबातून जावं लागतं. एसीचा कॉम्प्रेसर रेफ्रिजरंटच्या रेणूला (Molecule) वायूरूपात घट्ट पकडून ठेवतो. या प्रक्रियेमुळे तापमान आणि दाब या दोन्हींमध्ये वाढ होते. वायूचं वहन उष्णतेकडून थंड हवामानाकडे होत असतं. त्यामुळे यातील गरम हवा बाहेरच्या तुलनेने थंड असलेल्या हवेकडे जाते आणि कंडेन्सरच्या (Condenser) साहाय्याने थंड होऊन बाहेर पडते.

(वाचा - फेसबुकवर 48 राज्यांनी भरला खटला; Instagram आणि Whatsapp विकावं लागणार?)

एसीचा कॉम्प्रेसर किती दिवस काम करतो?

एसीचा कॉम्प्रेसर साधारणतः 10 ते 12 वर्षं टिकतो. त्यापूर्वीच जर तुमच्या एसीतील कॉम्प्रेसरमध्ये काही बिघाड झाला असेल, तर मेकॅनिकला दाखवणं आवश्यक आहे. तुम्ही स्वतः दुरुस्त करण्याचा प्रयत्नही करू नका.

एसीचा कॉम्प्रेसर कोणत्या कारणांनी बिघडतो?

कॉइल खराब झाल्यास, वीज प्रवाहात बिघाड असल्यास, एसीच्या सिस्टीममध्ये कचरा असल्यास, सक्शन लाइनमध्ये (Suction Line) अडथळा निर्माण होणं, वंगणाच्या तेलात चिकटपणा कमी असणं, रेफ्रिजरंट अधिक प्रमाणात असणं अशा कारणांमुळे एसीचा कॉम्प्रेसर खराब होऊ शकतो.

(वाचा - सायबर सुरक्षा देणाऱ्या सर्वात मोठ्या फर्मवर सायबर हल्ला,महत्त्वाच्या Toolची चोरी)

कॉम्प्रेसर खराब झाल्याची लक्षणं कोणती?

एसीतून थंड हवा येण्याऐवजी गरम हवा बाहेर पडणं, एसीमधून तऱ्हेतऱ्हेचे आवाज येणं, एसीच्या युनिटमध्ये गळती, कॉम्प्रेसर सुरू न होणं, हवा कमी प्रमाणात येणं अशी लक्षणं दिसली, तर कॉम्प्रेसरमध्ये बिघाड झाल्याचं लक्षात येतं.

First published: