VIDEO : पाहा पाण्यावर चालणारी कार! मोबाइलनेही करता येते ऑपरेट

VIDEO : पाहा पाण्यावर चालणारी कार! मोबाइलनेही करता येते ऑपरेट

पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत चालले आहेत. त्याचबरोबर इंधनाचा साठाही कमी होत चाललाय. त्यामुळेच गाड्या काय पाण्यावर चालवणार का ? असा प्रश्न आपण गंमतीने विचारतो. पण मध्य प्रदेशमधल्या एका गॅरेज तंत्रज्ञाने ही गंमत खरी करून दाखवली आहे. त्यांनी खरोखरच पाण्यावर चालणारी कार बनवली आहे !

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत चालले आहेत. त्याचबरोबर इंधनाचा साठाही कमी होत चाललाय. त्यामुळेच गाड्या काय पाण्यावर चालवणार का ? असा प्रश्न आपण गंमतीने विचारतो. पण मध्य प्रदेशमधल्या एका गॅरेज तंत्रज्ञाने ही गंमत खरी करून दाखवली आहे. त्यांनी खरोखरच पाण्यावर चालणारी कार बनवली आहे !

गॅरेजमध्ये केलं संशोधन

मध्य प्रदेशच्या सागरमधले मोहम्मद रईस मेहमुदी मकरानी हे गेली 35 वर्षं गॅरेजमध्ये काम करत आहेत. याच गॅरेजमध्ये संशोधन करून मकरानी यांनी ही पाण्यावर चालणारी कार बनवली.

अशी कार बनवण्यासाठी त्यांनी 2007 मध्ये संशोधन सुरू केलं. त्यांनी कॅल्शियम कार्बाइड आणि पाणी यात विशिष्ट प्रकारची रिअॅक्शन घडवली. या प्रक्रियेतून सीएनजी किंवा एलपीजी सारख्या गॅसची निर्मिती होते. या गॅसवर ही कार चालते.

50 ते ६० किमी प्रतितास

मकरानी सांगतात, त्यांना हे इंजिन बनवण्यासाठीच दीड वर्षं लागलं.त्यांनी त्यांच्या मारुती 800 गाडीवरच वेगवेगळे प्रयोग केले आणि अखेर ही पाण्यावर चालणारी कार तयार झाली.

शक्तिशाली स्वदेशी रॉकेट बाहुबली, पाहा चांद्रयान -2 चे खास फोटो

ही कार ज्या गॅसवर चालते तो गॅस एलपीजी किंवा सीएनजीपेक्षा जास्त ज्वलनशील आहे. पण तरीही पुरेशी खबरदारी घेतली तर ही कार पाण्यावर चालू शकते. या इंधनावर ही कार 50 ते 60 किमी प्रतितास या वेगाने चालते.

पाण्यावर चालणारी ही कार बनवण्यासाठी मकरानींना 7 लाख रुपये खर्च आला. या कारसाठी दुबई आणि चीनच्या कंपन्यांनी त्यांना ऑफर दिली आहे. पण मकरानींना देशासाठीच काम करायचं आहे. मेक इन इंडिया अभियानामुळे त्यांना प्रेरणा मिळालीय.

मोबाइलने करा ऑपरेट

पाण्यावर चालणारी कार हे या कारचं एकमेव उद्दिष्ट नाही. मकरानी यांनी ही गाडी मोबाइलद्वारे ऑपरेट करण्याचं तंत्रही शोधून काढलं आहे. ही गाडी मोबाइलच्या नेटवर्कची फ्रिक्वेन्सी वापरून ऑपरेट करता येते. मोबाइलनेच चालू - बंदही करता येते.  त्यामुळे ड्रायव्हरलेस कारचं स्वप्नही आपण पूर्ण करू शकतो.

=======================================================================================

'बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल', देवकी पंडित यांच्या गाण्यातून पांडुरंगाला साद

First published: July 12, 2019, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading