मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

फक्त एक कप पाण्यात 80 सेकंदांत कपडे चकाचक करते ही स्वदेशी Washing Machine; डिटर्जंटची गरज नाही

फक्त एक कप पाण्यात 80 सेकंदांत कपडे चकाचक करते ही स्वदेशी Washing Machine; डिटर्जंटची गरज नाही

पाणी आणि डिटर्जंटशिवाय कपडे धुणारी वॉशिंग मशीन (प्रतीकात्मक फोटो)

पाणी आणि डिटर्जंटशिवाय कपडे धुणारी वॉशिंग मशीन (प्रतीकात्मक फोटो)

स्वदेशी कंपनीने पाणी आणि डिटर्जंटशिवाय कपडे धुणारी वॉशिंग मशीन तयार केली आहे.

मुंबई, 11 ऑगस्ट : कपडे धुणं हे रोजच्या कामांपैकीच एक बरंच कंटाळवाणं काम आहे. तुमच्यापैकी कित्येकांना घरी वॉशिंग मशीन असावं असं वाटत असेल; मात्र वॉशिंग मशीनसाठी (Washing Machine) लागणारं खूप पाणी आणि भरमसाठ डिटर्जंट या गोष्टींमुळे कित्येक जण वॉशिंग मशीन घेणं टाळतात; मात्र आता एका कंपनीने असं वॉशिंग मशीन लाँच केली आहे, ज्यामध्ये कपडे धुण्यासाठी अवघ्या एक कप पाण्याची (Waterless Washing Machine) गरज भासते. शिवाय, डिटर्जंटची तर गरजच भासत नाही. विशेष म्हणजे, या मशीनमध्ये अवघ्या 80 सेकंदांत कपडे धुऊन (Machine washes clothes in 80 Seconds) होतात. ‘80 वॉश’ (80 Wash) असं या वॉशिंग मशीन कंपनीचं नाव आहे. विशेष म्हणजे ही स्वदेशी स्टार्टअप कंपनी आहे. या कंपनीने दावा केला आहे, की त्यांचं वॉशिंग मशीन अगदी कमी पाण्यात आणि डिटर्जंटशिवाय कपडे स्वच्छ धुऊ शकते. नितीन कुमार सलूजा आणि वीरेंद्र सिंह या दोघांनी ही कंपनी (Indian Washing Machine Start-up) सुरू केली आहे. '80 वॉश'च्या वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही केवळ कपडेच नाही, तर लोखंडी वस्तू आणि पीपीई किटदेखील धुऊ शकाल असाही दावा कंपनीने केला आहे. हे वाचा - कार चोरी झाली तर मिनिटांमध्येच शोधून काढेल हे डिव्हाईस, किंमत फक्त 1099 रुपये! हे वॉशिंग मशीन ISP स्टीम तंत्रज्ञानावर (ISP Steam technology) आधारित आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने हे मशीन कपड्यांमधले बॅक्टेरिया लो फ्रीक्वेन्सी रेडिओ फ्रीक्वेन्सीवर आधारित मायक्रोवेव्हच्या मदतीने नष्ट करते. तसंच, कपड्यांवरचे डाग घालवण्यासाठी रूम टेम्परेचर आणि ड्राय स्टीम जनरेटरचा वापर करण्यात येतो. कंपनीने असा दावा केला आहे, की त्यांचं मशीन अवघ्या 80 सेकंदांमध्ये कपडे धुऊ शकतं; मात्र हा वेळ कपड्यांच्या क्षमतेनुसार बदलतो. हे मशीन विविध प्रकारच्या आकारामध्ये उपलब्ध आहे. सात ते आठ किलोच्या मॉडेलमध्ये सुमारे 5 कपडे धुण्यासाठी एक कप पाण्याची गरज लागते. एवढे कपडे मशीन 80 सेकंदांत धुऊ शकतं. या मशीनचं 70-80 किलोचं मॉडेलही उपलब्ध आहे. त्यामध्ये अर्थातच तुम्ही भरपूर कपडे धुऊ शकता; मात्र त्यासाठी पाच ते सहा ग्लास पाणी आणि जास्त वेळेची गरज लागेल. हे वाचा - Whatsapp New Features : चॅटिंग करत असाल तरी तुम्ही ऑनलाइन दिसणार नाही; व्हॉट्सअ‍ॅपचे 3 नवे जबरदस्त फिचर या मशीनची किंमत आणि इतर गोष्टींबाबत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. www.80wash.com ही कंपनीची वेबसाइट असून, त्यावर तुम्हाला या मशीनसंबंधी अधिक माहिती मिळेल.
First published:

Tags: Tech news, Technology

पुढील बातम्या