• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Windows 11 च्या हिशोबाने कोणता नवा लॅपटॉप घेताय? यात मिळेल अपडेटेड वर्जन

Windows 11 च्या हिशोबाने कोणता नवा लॅपटॉप घेताय? यात मिळेल अपडेटेड वर्जन

मायक्रोसॉफ्टचं नवं Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम या वर्षाच्या अखेरीस येणार असून यासह सर्वात मोठा प्रश्न कम्पेटिबिलिटीचा आहे, की कोणता लॅपटॉप विंडोज 11 सपोर्ट करेल आण कोणता नाही. HP, Dell, आणि Asus ने त्यांचे कोणते लॅपटॉप Windows 11 ला सपोर्ट करतील याबाबत सांगितलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जून: मायक्रोसॉफ्टने (Microsoft) नुकतंच अधिकृतपणे आपल्या विंडोज 11 ची (Windows 11) घोषणा केली. मायक्रोसॉफ्टचं हे नवं ऑपरेटिंग सिस्टम या वर्षाच्या अखेरीस येणार असून यासह सर्वात मोठा प्रश्न कम्पेटिबिलिटीचा आहे, की कोणता लॅपटॉप विंडोज 11 सपोर्ट करेल आण कोणता नाही. HP, Dell, आणि Asus सारख्या निर्मात्यांनी त्यांचे कोणते लॅपटॉप Windows 11 ला सपोर्ट करतील याबाबत सांगितलं आहे. तर HP आणि Dell कडून त्यांच्या अधिकतर मशिन्स Windows 11 युक्त असतील असं सांगण्यात आलं आहे. Asus ने लॅपटॉपची संपूर्ण यादी जाहीर केली आहे, ज्यात विंडोज 11 सपोर्ट असेल. Asus Windows 11 - असूस प्रोआर्ट स्टूडियोबुक वन, प्रोआर्ट स्टूडियोबुक प्रो एक्स, प्रोआर्ट स्टूडियोबुक प्रो 15, प्रोआर्ट स्टूडियोबुक प्रो 17, असूस जेनबुक प्रो डुओ 15 ओएलईडी, जेनबुक प्रो डुओ, जेनबुक प्रो 14, जेनबुक प्रो 15 , जेनबुक 3 डीलक्स, जेनबुक एस, जेनबुक एस13, जेनबुक फ्लिप एस, जेनबुक फ्लिप 13, जेनबुक फ्लिप 14, जेनबुक फ्लिप 15, जेनबुक फ्लिप 15 ओएलईडी, जेनबुक यूएक्स 310, जेनबुक यूएक्स 311, जेनबुक 13 ओएलईडी, जेनबुक 13, जेनबुक यूएक्स 410, जेनबुक 14 , जेनबुक 14 अल्ट्रालाइट, जेनबुक डुओ, जेनबुक डुओ 14, जेनबुक 15, वीवोबुक प्रो 15, वीवोबुक एस13, वीवोबुक एस 14, वीवोबुक एस 15, वीवोबुक फ्लिप 12, वीवोबुक फ्लिप 14, वीवोबुक फ्लिप 15, वीवोबुक 14 आणि असूस वीवोबुक 15

  (वाचा - तुम्ही सर्च केलेली माहिती विश्वासार्ह नसल्यास Google स्वत:चं देणार इशारा)

  HP लॅपटॉप - एचपी स्पेक्टर, एचपी एनवी आणि एचपी पवेलियन रेंजच्या लॅपटॉपमध्ये नवं विंडोज ओएस मिळेल. नव्या एचपी ओमेन आणि एचपी विक्टस रेंजमध्येही Windows 11 कम्पेटिबिलिटी मिळेल.

  (वाचा - Microsoft Windows 11 लाँच, 6 वर्षानंतर नवं अपडेट; युजर्सला मिळणार हे खास फीचर्स)

  Dell - डेलने अद्याप या लिस्टचा खुलासा केलेला नाही, ज्यात Windows 11 कम्पेटिबिलिटी असेल. परंतु याचे अधिकतर लॅपटॉप विंडोज 11 मध्ये अपडेट होतील असं सांगण्यात आलं आहे.
  Published by:Karishma
  First published: