नवीन कार खरेदी करायची आहे? कंपनी आणि मॉडेल निवडण्यासाठी या गोष्टी ठरतील मदतशीर

नवीन कार खरेदी करायची आहे? कंपनी आणि मॉडेल निवडण्यासाठी या गोष्टी ठरतील मदतशीर

कोविड-19 मुळे (Covid-19) प्रवासासाठी सुरक्षित पर्याय म्हणून स्वतःची कार घेण्याला अनेकजण प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांत कार विक्रीचा आलेख झपाट्याने वाढला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 एप्रिल : आपल्याकडे Car असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सध्याच्या काळात तर कार घेण्यासाठी सुरक्षितता हे आणखी एक कारण मिळालं आहे. कोविड-19 मुळे (Covid-19) प्रवासासाठी सुरक्षित पर्याय म्हणून स्वतःची कार घेण्याला अनेकजण प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांत कार विक्रीचा आलेख झपाट्याने वाढला आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास मॉडेल (Model) आणि कंपनी (Company) निवडण्यासाठी या काही टिप्स नक्कीच उपयुक्त ठरतील.

कारची कंपनी कशी निवडावी -

प्रत्येकाचा आपल्या पहिल्या कारचा अनुभव कायम लक्षात असतो. त्यामुळे कोणाचा स्वत:च्या पहिल्या कारचा अनुभव चांगला नसेल, तर त्यांच्यासाठी हा सल्ला नक्कीच महत्त्वाचा ठरेल. भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी, हुंदाई, टाटा, महिंद्रा, फोर्ड, किया, फोक्सवॅगन, टोयोटा, होंडा, निसान, रेनॉ अशा अनेक कार कंपन्या आहेत. पण त्यापैकी मारुती ही सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. त्यानंतर हुंदाई आणि त्या पाठोपाठ टाटा मोटर्सचं नाव येतं. सर्वाधिक विक्री होणारी कार अधिक चांगली आणि जी कार कमी प्रमाणात विकली जाते ती खराब किंवा ती चांगली नाही, असा समज चुकीचा आहे. आपण आपल्या आवडीची कंपनी निवडावी. त्याबाबत तुमच्या माहितीतले जे लोक कार चालवतात त्यांना त्यांचा अनुभव विचारावा. त्यांचा सल्ला घ्यावा.

(वाचा - जुनी गाडी देऊन अशी मिळवा नवी कार; जाणून घ्या काय आहे ऑफर)

कार खरेदी करताना आपली गरज काय हे लक्षात घ्यावं -

एकदा कोणत्या कंपनीची कार घ्यायची हे निश्चित झाल्यानंतर आपल्याला किती सीटर कार खरेदी करण्याची गरज आहे ते लक्षात घ्यावं. आपलं कुटुंब लहान असेल, तर आपल्यासाठी हॅचबॅककार (Hatchback) हा योग्य पर्याय असेल. आपल्या कुटुंबात पाचपेक्षा जास्त लोक असल्यास 7 सीटर कार खरेदी करणं योग्य ठरेल. दुसरीकडे, आपल्या शहरातील रस्ते खराब असल्यास तुम्ही एसयूव्हीचा देखील (SUV) विचार करू शकता. तुम्ही नेहमी भरपूर सामान घेऊन प्रवास करत असाल तर सेडान कार (Sedan) योग्य ठरेल.

मायलेज आणि मेंटेनन्स खर्च लक्षात घेणं आवश्यक -

कोणतीही कार खरेदी करण्यापूर्वी आपल्याला त्या कारचं मायलेज (Milage) माहित असणं आवश्यक आहे. पेट्रोल कारपेक्षा डिझेल आणि सीएनजी कारचं मायलेज जास्त मिळतं. पण आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींत फार फरक उरलेला नाही. त्यामुळे आता डिझेल कार खरेदी करणं योग्य नाही. डिझेल कारचा मेंटेनन्स खर्च (Maintenance) हा पेट्रोल कारच्या तुलनेत खूप जास्त आहे. सीएनजी कारचं मायलेज जास्त असतं, परंतु सीएनजी किटमुळे कारमध्ये जागा कमी असते.

(वाचा - ड्रायव्हिंग टेस्टवेळी या चुकीमुळे 31 टक्के लोक होतात फेल, या गोष्टीकडे द्या लक्ष)

विमा आणि इतर कागदपत्रं -

कार खरेदी करताना विमा (Insurance) सर्वात महत्त्वाचा असतो. जवळजवळ सर्व वाहन कंपन्या आपल्या डीलरकडून कार विमा करून देतात. पण तुम्हाला बाहेरून कमी किमतीत विमा मिळत असेल, तर जरूर बाहेरून विमा घ्या.

First published: April 13, 2021, 8:52 AM IST
Tags: car

ताज्या बातम्या