Home /News /technology /

'या' सिक्रेट पद्धतीनी गुपचूप पाहा दुसऱ्यांचं WhatsApp Status

'या' सिक्रेट पद्धतीनी गुपचूप पाहा दुसऱ्यांचं WhatsApp Status

ही पद्धत वापरणं खूप सोपं असून यासाठी तुम्हाला whatsapp मधील Read receipt या फीचरचा वापर करावा लागणार आहे.

    मुंबई, 17 ऑक्टोबर : जगात सोशल मीडियावर नसणारी व्यक्ती आपल्याला आढळणार नाही. whatsapp, facebook आणि intagram चा आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. कोरोनाच्या या संकटात एकमेकांना थेट भेटता येत असल्याने सोशल मीडियावरून चॅटच्या माध्यमातून संवाद साधू शकतो. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले स्टेटस देखील बदलत असतात. आपल्या जवळच्या व्यक्ती आणि नातेवाईक आपले हे स्टेटस पाहत असतात. त्याचबरोबर आपण देखिल दुसऱ्याचे स्टेटस पाहू शकतो. परंतु आपण त्यांचे स्टेट्स पहिले आहे हे त्यांच्या लक्षात येतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज अशी एक युक्ती सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही दुसऱ्यांचं स्टेटस त्यांना कळू न देता म्हणजेच गुपचूप देखील पाहू शकता. अशा पद्धतीने पहा गुपचूप दुसऱ्यांचं स्टेटस ही पद्धत वापरणं खूप सोपं असून यासाठी तुम्हाला whatsapp मधील Read receipt या फीचरचा वापर करावा लागणार आहे. हे फिचर तुम्ही बंद केल्यास समोरच्या व्यक्तीला त्याचे स्टेटस पाहत आहेत की नाही हे समजू शकणार नाही. पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला देखील समोरच्या व्यक्तीनी तुमचं स्टेटस पहिले आहे की नाही हे समजणार नाही. Read receipt या फीचरचा वापर आपण पाठवलेला मेसेज कुणी वाचला आहे किंवा नाही हे कळण्यासाठी आहे. या फीचरमध्ये जर कुणी मेसेज वाचला असेल तर ब्लू टिक होते. त्यामुळे तुम्ही मेसेज वाचला आहे की नाही हे समोरच्या व्यक्तीला कळते. असं करा हे फिचर करा बंद Read receipt फीचर बंद करण्यासाठी तुम्हाला whatsapp च्या सेटिंगमध्ये जावं लागणार आहे. त्यानंतर अकाउंट सेक्शनमध्ये जाऊन प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला Read receipt हा पर्याय बंद करायचा आहे. त्यामुळे हा पर्याय बंद केल्यानंतर तुम्ही ज्यांचे स्टेटस पाहत आहात त्यांना कळणार नाही.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Techonology

    पुढील बातम्या