Jio पेक्षाही स्वस्त आहे Vodafoneचा प्लान, 1.5 GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग फ्री

Jio पेक्षाही स्वस्त आहे Vodafoneचा प्लान, 1.5 GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग फ्री

Jioला टक्कर देण्यासाठी Vodafone कंपनीने लाँच केला नवा प्लान, मिळणार या दोन ज्यादा सेवा.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी: सध्या नेटवर्कपासून ते रिचार्जपर्यंत जिओचा बोलबाल असताना वोडाफोन जिओला टक्कर देण्यासाठी ग्राहकांना काही खास ऑफर्स आणि विशेष प्लान लाँच करत आहे. यावेळी वोडाफोनने vodafone recharge plans अंतर्गत जिओच्या 555 प्लानला टक्कर देत 499 रुपयांचा प्लान लाँच केला आहे. 499च्या या प्लाममध्ये ग्राहकांना काय सुविधा मिळणार आणि हा प्लान जिओच्या प्लानपेक्षा का स्वस्त आणि जास्त फायद्याचा आहे पाहा.

vodafone recharge plans 499: या प्लानमध्ये ग्राहकांना 70 दिवसांची वैधता मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना 1.5 GB डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS दिवसाला मिळणार आहेत. त्यासोबत वोडाफोन पे सबस्क्रिप्शन आणि ZEE-5 अॅप सबस्क्रिप्शन मिळणार आहे. 70 दिवसांमध्ये ग्राहकांना 105 GB डेटा मिळणार आहे.

हेही वाचा-सावधान! तुमच्याकडे असलेला Android फोन असू शकतो धोकादायक

Reliance Jio 599 Rupees Plan-

जिओकडून 599 रुपयांचा 84 दिवसांसाठी नवा प्लान देण्यात आला आहे. यामध्ये दरदिवशी 2 GB डेटा मिळणार आहे. जिओ ते जिओ unlimited free calling आणि जिओ ते इतर नेटवर्कसाठी 3000 मिनिटं 84 दिवसांसाठी देण्यात आली आहेत. युझर्सला 84 दिवसांसाठी एकूण 168 जिबी डेटा मिळणार आहे. यासोबत रोज 100 फ्री SMS मिळणार आहेत.

यामध्ये जर आपण इतर नेटवर्कसाठी कॉलिंगचा जास्त वापर करत असाल तर जिओपेक्षा वोडाफोन इतर नेटवर्कसाठी कॉलिंग सुविधा चांगली देत आहे. त्यामुळे जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने हा लाँच केलेला प्लान पुन्हा एकदा मार्केटमध्ये कंपनीला उभारी देणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा-Vodafone-idea, Airtel होणार का बंद? सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कंपन्या अडचणीत

First published: February 17, 2020, 8:52 AM IST

ताज्या बातम्या