नवी दिल्ली, 19 मे : वोडाफोन आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक नवा 'फिल्मी रिचार्ज प्लॅन' घेऊन आलं आहे. या प्लॅनमध्ये फक्त 16 रुपयांत तुम्हाला 24 तासांसाठी 1GB डेटा मिळेल. वोडाफोनचा हा ‘डेटा ओनली प्रीपेड’ प्लान आहे. हा प्लान आयडिया युजर्ससाठसुद्धा उपलब्ध राहणार आहे. हा डेटा वोडाफोनच्या 'फिल्मी प्लान'च्या प्रीपेड ग्राहकांना वापरता येईल. या प्लॅनध्ये टॉकटाइम किंवा SMS पाठवण्याची सुविधा मिळणार नाही. तर युजर्सना दिवसाला 1GB डेटा 2G, 3G आणि 4G च्या स्वरुपात मिळेल.
सावधान! लटकत्या मोबाईल चार्जरची पिन तोंडात गेल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू
वोडाफोन कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन नावाप्रमाणेच फिल्मी आहे. हा प्लॅन अॅक्टिव्हेट करणाऱ्या युजर्सना त्याच्या स्मार्टफोनवर लेटेस्ट ब्लॉकबस्टर मुव्हीज पाहता येतील. याशिवाय वोडाफोन युजर्ससाठी आणखी इंटरनेट पॅक यात देण्यात आले आहेत. युजर्सना 29 रुपयामध्ये एक इंटरनेट पॅक मिळेल, ज्यात 18 दिवस 500MB डेटा त्याला मिळेल. तसंच 47 रुपयांचासुद्धा एक प्लॅन आहे. ज्यात युजर्सना एका दिवसाला 3GB डेटा मिळेल. 92 रुपयांच्या पॅकमध्ये सात दिवस 6GB डेटा देण्यात येणार आहे. याशिवाय 28 दिवसांच्या वैधतेसह 98 रुपयांत 3GB डेटा, 49 रुपयांत 1GB आणि 33 रुपयांत 500MB डेटा मिळेल.
तरुणांसाठी नेव्हीमध्ये उत्तम पगाराच्या नोकरीची संधी; असा करा अर्ज
वोडाफोनच्या बेसिक प्लॅनचा फायदा -
'वोडाफोन रेड पोस्टपेड प्लॅन' आणि 'बेनिफिट वोडाफोन रेड पोर्टफोलियो' चा प्लॅन 399 रुपयांचा आहे. यात यूजर्सना 1498 रुपयांचा फायदा मिळेल. या ऑफरमध्ये कंपनी दर महिन्याला 40GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे. एका महीन्यात इतकी डेटा ऑफर करणारी ही पहिलीच कंपनी आहे. युजर्सना 200GB डेटा रोलओव्हर करता येईल.