Vodafone कडून 150 जीबी बोनस डेटा, 399 रुपयांच्या प्लॅनवर ऑफर

Vodafone कडून 150 जीबी बोनस डेटा, 399 रुपयांच्या प्लॅनवर ऑफर

व्होडाफोनने त्यांच्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली असून सध्याच्या 399 रुपयांच्या प्लॅनवर 150 जीबी एक्स्ट्रा डेटा देण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर : सध्या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या ऑफर देत आहेत. नुकतीच जिओनं नॉन जिओ कॉलिंगवर पैसे आकरण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, व्होडाफोन, आयडिय़ा आणि एअरटेल कंपन्यांकडून ऑफक दिल्या जात आहेत. कंपन्यांनी इतर नेटवर्कवर कॉल करण्यसाठी अतिरिक्त पैसे आकारणार नसल्याचंही म्हटलं आहे.

Vodafone-Idea कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना सध्याच्या प्लॅनवर जास्त डेटा देण्याची घोषणा केली आहे. पोस्टपेडच्या 399 रुपयांच्या प्लॅनवर कंपनी 150 जीबीपर्यंत जास्तीचा डेटा देणार आहे. एवढंच नाही तर त्याची मुदतही सहा महिन्यांपर्यंत असणार आहे.

Vodafone च्या 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये युजर्सना प्रत्येक महिन्याला 40 जीबी डेटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोमिंगही दिलं जातं. याच प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना सहा महिन्याच्या मुदतीसह 150 जीबी डेटा देणार आहे.

व्होडाफोनच्या प्लॅनमध्ये 200 जीबी डेटा Rollover लिमिटमध्ये आहे. म्हणजेच त्याचा वापर नाही झाला तर तो पुढच्या महिन्याच्या डेटामध्ये वाढवून देण्यात येईल. याशिवाय व्होडाफोन प्ले, मोबाइल शील्ड आणि जी5 चे सबस्क्रिप्शन या पॅकवर मिळते. कंपनीच्या या प्लॅनमुळे ग्राहकांना तब्बल 2 हजार 497 रुपयांचा फायदा मिळत असल्याचा दावा व्होडाफोनने केला आहे.

VIDEO : पैशांचा एवढा पाऊस झाला की नोटा मोजण्यासाठी आणावं लागलं मशीन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: vodafone
First Published: Oct 14, 2019 10:01 PM IST

ताज्या बातम्या