Home /News /technology /

Vodafone-Idea ची ऑफर, इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

Vodafone-Idea ची ऑफर, इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

व्होडाफोन-आयडिया ने ग्राहकाना या रिचार्जमधून पैसे कमावण्यासाठी एक ऑफर दिली आहे.

    मुंबई, 10 एप्रिल : चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्ज करणं कठीण झालं आहे. ऑनलाइन रिचार्जचा पर्याय अनेकजण वापरतात. आता व्होडाफोन-आयडिया ने ग्राहकाना या रिचार्जमधून पैसे कमावण्याची ऑफर दिली आहे. व्होडाफोन आयडियाच्या इतर ग्राहकांचे रिचार्ज केल्यास 6 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. कंपनीने रिचार्ज फॉर गुड असा नवीन प्रोग्रॅम सुरू केला आहे.  लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना रिचार्ज उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. इतर लोकांना रिचार्ज मिळेल आणि ते करणाऱ्या ग्राहकाला कॅशबॅक मिळेल. रिचार्ज फॉर गुड ऑफर मधून वोडोफोन आयडियाच्या ग्राहकांना पैसे वाचवण्याची संधी मिळणार आहे. रिचार्जवर 6 टक्के कॅशबॅकची ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. 9 एप्रिल 2020 ते 31 एप्रिल 2020 या काळातच रिचार्ज फॉर गुड ऑफर सुरू असणार आहे. हे वाचा : Lockdownदरम्यान आपल्या मोबाईलचं SIM खराब झालं तर काय करावं? व्होडाफोन आयडियाच्या सबस्क्रायबर्सना कॅशबॅकच्या ऑफरचा लाभ घेता येईल. त्याशिवाय तुम्हाला My Vodafone, MY Idea यापैकी अॅप इन्स्टॉल करून LogIn करावं लागेल. या अॅपमधून ग्राहकांना वेगवेगळ्या रिचार्ज ऑफर आणि सध्याच्या रिचार्जची डिटेल्स मिळतात. या अॅप्सवरून कोणत्याही इतर ग्राहकांचा रिचार्ज केल्यास 6 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळते. कॅशबॅकमध्ये मिळणाऱ्या रकमेचा वापर तुम्हाला पुढच्या रिचार्जसाठी करता येईल. व्होडाफोन-आयडिया यांच्याआधी एअरटेल आणि जिओने त्यांच्या ग्राहकांना अशी सुविधा दिली आहे. हे वाचा : कॉल ड्रॉप किंवा आवाज कट होतोय का? तुमच्या स्मार्टफोनवर असलेलं 'हे' फीचर वापरा संपादन - सुरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus, Vodafone

    पुढील बातम्या