Home /News /technology /

Vodafone-Idea ग्राहकांना फटका; दोन पॉप्युलर रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ

Vodafone-Idea ग्राहकांना फटका; दोन पॉप्युलर रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ

कंपनीने त्यांच्या सर्वात पॉप्युलर प्लॅन, सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. या पॉप्युलर प्लॅनमध्ये कंपनीने थेट 50 रुपयांची वाढ केली आहे.

  नवी दिल्ली, 1 डिसेंबर : जर तुम्ही वोडाफोन-आयडिया युजर आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कंपनीने त्यांच्या सर्वात पॉप्युलर प्लॅन, सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. या पॉप्युलर प्लॅनमध्ये कंपनीने थेट 50 रुपयांची वाढ केली आहे. हे नवे टेरिफ आता त्या सर्व सर्कलमध्ये लागू होणार, जेथे वोडाफोन-आयडिया, रेड फॅमिली प्लॅन देते. या दोन्ही प्लॅनमध्ये Amazon Prime, Zee5, आणि Vi Movies & TV चं एक वर्षाचं फ्री सब्सक्रिप्शन सामिल आहे. काय आहे नव्या प्लॅनची किंमत - कंपनीने 598 रुपये आणि 749 रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, Viचा 598 रुपयांचा फॅमिली प्लॅन आता 649 रुपये इतका झाला आहे. तर 749 रुपयांच्या रेड फॅमिली प्लॅनची किंमत वाढून 799 रुपये झाली आहे. ज्या सर्कल्समध्ये वोडाफोन-आयडियाचे हे प्लॅन चालू आहेत, तेथे या नव्या किंमती लागू करण्यात आल्या आहेत.

  (वाचा - लाख भर किंमतीचा Apple iPhone 12 Pro बनतो हजारात; पण रिटेल प्राईज इतकी का?)

  649 रुपये पोस्टपेड प्लॅन - वोडाफोन-आयडियाच्या (Vi) 649 रुपये रेड फॅमिली प्लॅनची आधीची किंमत 598 आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 80GB डेटा मिळतो. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि एक महिन्यासाठी 100 SMS दिले जातात. 80GB डेटा दोन भागात विभागला जातो. प्रायमरी कनेक्शन 50GB डेटा आणि सेकंडरी कनेक्शन 30GB डेटाचा वापर केला जाऊ शकतो.

  (वाचा - Airtel ची धमाकेदार ऑफर; फ्रीमध्ये मिळतोय 5GB इंटरनेट डेटा, असा घ्या फायदा)

  799 रुपये पोस्टपेड प्लान - Vi च्या 749 रुपये रेड फॅमिली प्लॅनची, नवी किंमत 799 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 120GB डेटा मिळतो. यात एकूण तीन कनेक्शनची सुविधा देण्यात आली आहे. प्रायमरी कनेक्शन 60GB आणि बाकी दोन सेकंडरी कनेक्शन 30-30GB डेटाचा वापर करू शकतात. त्याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि एक महिन्यासाठी 100 SMS देण्यात येतात. दोन्ही प्लॅनमध्ये Amazon Prime, Zee5, आणि Vi Movies & TV चं एक वर्षाचं फ्री सब्सक्रिप्शन सामिल आहे. VI त्यांच्या केवळ प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्ससाठीही विविध सुविधा आणि किंमतीचे प्लॅन ऑफर करते. कंपनी वैयक्तिक युजरसाठीही पाच प्रकारचे पोस्टपेड प्लॅन ऑफर करत असून फॅमिलीसाठी कंपनीकडे चार प्लॅन आहेत.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Recharge, Vodafone, Vodafone idea tariff plan

  पुढील बातम्या