JIOने फ्री कॉल केले बंद, पण Vodafone-Ideaने ग्राहकांना दिला मोठा दिलासा

JIOने फ्री कॉल केले बंद, पण Vodafone-Ideaने ग्राहकांना दिला मोठा दिलासा

रिलायन्स जिओने Jio आजपासून फ्री आउटगोइंग कॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : रिलायन्स जिओने Jio आजपासून फ्री आउटगोइंग कॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Relaince JIO जिओ नेटवर्कवरून दुसऱ्या कुठल्याही इतर मोबाईल नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या फोनला आता 6 पैसे प्रतिमिनिट एवढं शुल्क लागणार आहे. दरम्या रियालन्स जिओनं ही घोषणा केल्यानंतर व्होडाफोन आणि आयडियानं (Vodafone-Idea) नवी शक्कल लढवली आहे. व्होडाफोनच्या वतीनं नेटवर्कच्या बाहेर फोन केल्यास ग्राहकांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही आहे. व्होडाफोन आणि आयडिया कंपनीनं ग्राहकांना हा क्रमांक आपल्याच नेटवर्कचा आहे, हे कळावे म्हणून हा निर्णय घेतला आहे.

न्यूज-18ला दिलेल्या माहितीत व्होडाफोन आणि आयडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी, “IUC (इंटरकनेक्ट युझर चार्ज) हा ऑपरेटर यांच्यातील वाद आहे. याचा भार ग्राहकांवर पडता कामा नये. कंपनी संपूर्ण भारतात 2जी, 3जी आणि 4जी सर्व्हिस देतात”, असे सांगितले. तसेच, 60 टक्के ग्राहक हा कमी खर्च करणारा हे, त्यामुळं त्याच्यावर अतिरिक्त भार टाकला जाणार नाही.

दरम्यान व्होडाफोन आपल्या ग्राहकांच्या क्रमांक चालू ठेवण्यासाठी कमीत कमी 24 रुपयेचा रिचार्ज करणे बंधनकारक असते. यात 28 दिवसांची वैधता मिळते. तर, व्होडाफोन आयडियाच्या 119च्या रिजार्चवर 28 दिवसांची वैधता मिळते. त्याचबरोबर 1 जीबी डेटाही मिळतो.

वाचा-IUC चार्जेस म्हणजे काय? JIO चं फ्री कॉल बंद झाल्यामागे आहे हे कारण

10 ऑक्टोबरपासून जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल्ससाठी IUC रिचार्ज व्हाउचर्स घ्यावी लागणार आहेत. प्रत्येक 10 रुपयांच्या रिचार्जवर 1 GB डेटा फ्री मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या वतीने ही शुल्कवाढ नसून IUC चार्जेसची वसुली असल्याचं म्हटलं आहे. Jio जिओ फोनवरून दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल फोनवर कॉल करण्यासाठी हे पैसे पडणार आहेत. रिलायन्स जिओची सेवा आता पूर्णपणे मोफत मिळणार नसल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC)ग्राहकांकडून वसून करण्यासाठी धोरणामध्ये हा बदल करण्यात आला आहे.

वाचा-जिओचा मोठा निर्णय! ठराविक आउटगोइंग कॉल्ससाठी आता मोजावे लागतील पैसे

IUC चार्ज म्हणजे काय?

- इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC) म्हणजे एका मोबाईल नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमधल्या मोबाईलला कनेक्ट करण्यासाठीचं शुल्क.

- देशभरात IUC चा दर सारखाच असावा यासाठी TRAI टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया आग्रही आहे.

- TRAI ट्रायने ठरवल्यानुसार सध्या IUC चा दर 6 पैसे प्रतिमिनिट इतका आहे. तोच रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता आउटगोइंग कॉल्ससाठी द्यावा लागणार आहे.

- गेल्या तीन वर्षांत जिओने IUC साठी इतर मोबाईल कंपन्यांना 13 हजार 500 कोटी रुपये मोजले आहेत.

- IUC शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा TRAI चा आग्रह आहे. त्यानुसार प्राधिकरणाने सर्व मोबाईल कंपन्यांना सूचनाही केल्या आहेत.

- IUC पूर्ण रद्द करण्याची शेवटची मुदत 1 जानेवारी 2020 आहे. त्याअगोदर हे दर बंद होणं अपेक्षित आहे.

- Jio ने दिलेल्या माहितीनुसार, आउटगोइंग कॉल्सला लावलं जाणारं शुल्क हे IUC मुळे आहे. त्यामुळे IUC बंद होईल त्यादिवशी पुन्हा एकदा जिओचे सर्व कॉल्स फ्री होतील.

VIDEO :...म्हणून रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 12:38 PM IST

ताज्या बातम्या