Home /News /technology /

महिलांच्या सुरक्षेसाठी VI आणि नासकॉम फाउंडेशनचा पुढाकार! लाँच केलं My Ambar अ‍ॅप

महिलांच्या सुरक्षेसाठी VI आणि नासकॉम फाउंडेशनचा पुढाकार! लाँच केलं My Ambar अ‍ॅप

देशात विशेषत: महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या सक्षमिकरणासाठी उपाय म्हणून हे ऍप विकसित करण्यात आलं आहे.

    नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : वोडाफोन-आयडिया (Vodafone Idea) आणि नासकॉम फाऊंडेशनने (NASSCOM Foundation) गुरूवारी देशात महिला सुरक्षेसाठी एक ऍप लाँच केलं आहे. 'माय अंबर' (My Ambar) असं या ऍपचं नाव असून 'कनेक्टिंग फॉर गुड प्रोग्राम' याअंतर्गत या दोन कंपन्यांनी हे ऍप विकसित केलं आहे. 'माय अंबर' ऍप महिलांना त्यांच्या विरोधात होणाऱ्या अत्याचाराविरोधात, आवाज उठवण्यासाठी मदत करणार असून हा या ऍपमागचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वोडाफोन-आयडिया आणि नासकॉम फाउंडेशनने, सेफ्टी ट्रस्ट आणि संयुक्त राष्ट्र महिला यांच्यासोबत मिळून 'माय अंबर' ऍपची घोषणा केली आहे. देशात विशेषत: महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या सक्षमिकरणासाठी उपाय म्हणून हे ऍप विकसित करण्यात आलं आहे. (वाचा - सावधान! Google ची तुमच्या activity वर नजर; Google कडे आहे तुमचा संपूर्ण डेटा?) हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध - हे ऍप इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहे. देशभरात उपलब्ध असलेल्या सेवा प्रदात्यांसह आणि हेल्पलाईनसह हे ऍप जोडण्यात आलं आहे. या ऍपअंतर्गत संकटाच्या वेळी महिलांना एकाच व्यासपीठावर मदत, आवश्यक माहिती, सूचना आणि मदत पोहचवली जाणार असल्याचं, वोडाफोन-आयडियाचे मुख्य नियामक अधिकारी पी. बालाजी यांनी सांगितलं. (वाचा - जुलै ते सप्टेंबरमध्ये 5 कोटी स्मार्टफोनची विक्री; टॉप 5 मध्ये चार चीनी कंपन्या)
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या