VODAFONE-IDEA चे ऐतिहासिक नुकसान; दुसऱ्या तिमाहीत 50 हजार कोटींचा फटका

VODAFONE-IDEA चे ऐतिहासिक नुकसान; दुसऱ्या तिमाहीत 50 हजार कोटींचा फटका

व्होडाफोन, आयडीया आणि एअरटेल या कंपन्यांना चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण जवळपास 74 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : सर्वोच्च न्यायालयाने एजीआरवर दिलेल्या निर्णयानंतर थकबाकीची रक्कम भरण्यामुळे व्होडाफोन, आयडीया आणि एअरटेल या कंपन्यांना चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण जवळपास 74 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यामध्ये व्होडाफोन आयडिया यांचे 50 हजार 921 कोटी तर एअरटेलचं 23 हजार 45 कोटी इतकं नुकसान झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. यामुळे कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

याआधी टाटा मोटर्सने ऑक्टोबर-डिसेंबर 2018 च्या तिमाहीत 26 हजार 961 कोटी रुपयांचे नुकसान दाखवले होते. तेव्हा तो भारतीय कंपनीला झालेला सर्वात मोठा तोटा होता. व्होडाफोन आयडियाने न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे म्हटलं आहे. कंपनीने म्हटलं की, कंपनी चालवण कठीण झालं आहे. सरकारकडून मिळणाऱा दिलासा आणि कायदेशीर प्रकरणांमध्ये सकारात्मक निर्णयावर सर्व अवलंबून आहे. एजीआरबाबात न्यायालयाच्या निर्णयाने दूरसंचार उद्योगावर परिणाम होईल.

रिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर दूरसंचार कंपन्यांवर आधीपासूनच स्पर्धेत टिकण्याचं आव्हान आहे. त्यानंतर आता अब्जावधी डॉलर्सचं कर्ज आहे. व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि इतर दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्या सरकारला 1.4 लाख कोटी रुपये देणे बाकी आहे.

दूरसंचार विभागाच्या नव्या माहितीनुसार एअरटेलची 62 हजार 187 कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. तर व्होडाफोन आयडिया यांच्या 54 हजार 184 कोटी आहेत. याशिवाय बीएसएनएल, एमटीएनएल यांच्यावरही भार आहे. यामुळे कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

VIDEO : सेनेच्या तीन अंकी नाटकावर लक्ष्य, आशिष शेलारांचा टोला

First published: November 15, 2019, 10:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading