मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सॅमसंगच्या फोल्डेबल फोनला टक्कर देणार व्हिवोचा नवा हॅंडसेट

सॅमसंगच्या फोल्डेबल फोनला टक्कर देणार व्हिवोचा नवा हॅंडसेट

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

व्हिवो कंपनीनं व्हिवो एक्स फोल्ड प्लस हा नवा स्मार्टफोन लॉंच केला आहे. या फोनमध्ये खास फीचर्स आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : ग्राहकांच्या गरजा आणि आवडीचा कल लक्ष घेऊन स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या बाजारात सातत्याने नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत असतात. सध्या बाजारात अ‍ॅपल, सॅमसंग, ओप्पो, शाओमी, व्हिवो आदी प्रमुख कंपन्यांचे वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. अ‍ॅपलची आयफोन 14 सीरिज, तसंच सॅमसंग कंपनीचा फोल्डेबल फोन सध्या जोरदार चर्चेत आहे. या खास स्मार्टफोनच्या मालिकेत आता एका नव्या हॅंडसेटची भर पडत आहे.

व्हिवो कंपनीनं व्हिवो एक्स फोल्ड प्लस हा नवा स्मार्टफोन लॉंच केला आहे. या फोनमध्ये खास फीचर्स आहेत. त्यात दोन डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग आणि क्वालकॉम फ्लॅगशिप चिपसेट यांचा समावेश आहे. याशिवाय या हॅंडसेटमध्ये युझर्सचा कल लक्षात घेऊन अजूनही काही वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स देण्यात आली आहेत.

व्हिवो या स्मार्टफोन उत्पादक कंपनीनं ग्राहकांसाठी पॉवरफुल फीचर्स असलेला व्हिवो एक्स फोल्ड प्लस हा नवा स्मार्टफोन लॉंच केला आहे. या फोनमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. या फोनमधली फीचर्स पाहता तो सॅमसंगच्या फोल्डेबल फोनशी नक्की स्पर्धा करणार अशी चर्चा आहे.

व्हिवो एक्स फोल्ड प्लसच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हॅरिएंटची किंमत 9999 चिनी युआन म्हणजेच सुमारे 1,15,000 रुपये आहे. टॉप व्हॅरिएंटमध्ये कंपनीने 12GB रॅम आणि 512 GB स्टोरेजची किंमत 10,999 चिनी युआन म्हणजेच सुमारे सव्वा लाख रुपये ठेवली आहे. हा हॅंडसेट लाल, काळा आणि निळा अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.

व्हिवो एक्स फोल्ड प्लस या नव्या हॅंडसेटमध्ये ड्युएल सिम, ब्लूटूथ व्हर्जन 5.2, ड्युएल बॅंड वाय-फाय, तसंच एनएफसी सपोर्ट मिळणार आहे. सुरक्षेसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तसंच फेस अनलॉक सपोर्ट देण्यात आला आहे.

व्हिवोच्या या फोल्डेबल फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह 8.03 इंचाचा AMOLED प्रायमरी डिस्प्ले आहे. त्याचं रिझोल्युशन 2K (1916×2160) पिक्सेल आहे. तसंच यासोबत 6.53 इंचाचा दुसरा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तो फुल एचडी प्लस (1080×2520) पिक्सेल रिझोल्युशनला सपोर्ट करतो.

गेम मोड बूस्ट करण्यासाठी या दोन्ही डिस्प्लेजमध्ये 140Hz आणि 240Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी या फोल्डेबल फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 प्लस जनरेशन 1 चिपसेटसह ग्राफिक्ससाठी अ‍ॅड्रेनो 730 GPU आहे. हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड 12 वर आधारित ओरिजीन ओएसवर रन होतो.

व्हिवो एक्स फोल्ड प्लसमध्ये 80W वायर्ड आणि 50 W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4730mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमधली कॅमेरा फीचर्स दमदार आहेत. फोनच्या बॅक पॅनेलवर चार रिअर कॅमेरे आहेत.

हे कॅमेरे Zeiss सोबत डेव्हलप करण्यात आले आहेत. 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासोबत 48 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सर, 12 मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल पेरीस्कोप कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसंच या फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

First published:

Tags: Mobile, Smartphone, Tech news