एकापेक्षा एक भन्नाट फिचर्स असलेल्या Vivo V20 Pro 5G चं प्री बुकिंग सुरू; ही असेल किंमत

एकापेक्षा एक भन्नाट फिचर्स असलेल्या Vivo V20 Pro 5G चं प्री बुकिंग सुरू; ही असेल किंमत

Vivo V20 Pro 5G या बहुप्रतिक्षित स्मार्टफोनचं प्री बुकिंग भारतामध्ये सुरू झालं आहे. हा स्मार्टफोन वर्षाखेरीस भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया याचे आकर्षक फिचर्स आणि किंमत

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर: Vivo V20 Pro 5Gची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या स्मार्टफोनची भारतातली किंमत अखेर समजली आहे. Vivo कंपनीचा फोन घेणाऱ्यांसाठी उत्सुक असलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या फोनचं प्री बुकिंगही सुरू झालं आहे. Vivo V20 Pro हा स्मार्टफोन 30 हजारांपेक्षा कमी किंमतीत भारतामध्ये विकला जाणार आहे. हा स्मार्टफोन डिसेंबरच्या अखेरीस भारतामध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. भारतात लाँच होणारं स्मार्टफोनचं व्हर्जन हे आणि ग्लोबल लेव्हलवरील स्मार्टफोनचं व्हर्जन सारखंच असणार आहे.

Vivo V20 Pro 5G चे स्पेसिफिकेशन

Vivo V20 Pro 5G मध्ये 6.44 इंचाचा एचडी एमोलेड डिस्प्ले असेल.

स्नॅपड्रॅगन 765G चिपसेट देण्यात आली आहे.

8 जीबी रॅम आणि 128 जीबीचं इनबिल्ड स्टोअरेज देण्यात आलं आहे.

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Vivo V20 Pro हा फोन अँड्रॉयड 11 बेस्ड फनटच ओएस 11वर चालतो.

स्मार्टफोनला 4000mAhची बॅटरी देण्यात आली आहे.

कसा असेल कॅमेरा ?

या न्यू जनरेशन स्मार्टफोनमध्ये रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 64 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सला वाइड अँगल लेंन्स आणि 2 मेगापिक्सलाचा सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या पुढच्या बाजूला 44 मेगापिक्सल प्रायमरी आणि 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंन्स देण्यात आली आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 22, 2020, 9:42 PM IST

ताज्या बातम्या