चांगल्या बजेट मध्ये स्मार्टफोन शोधत आहात? तर vivo U10 एकदा बघाच

चांगल्या बजेट मध्ये स्मार्टफोन शोधत आहात? तर vivo U10 एकदा बघाच

vivo U10 विशेष किंमतीमध्ये भारतात लॉन्च झाला आहे. vivo U10 हा एकमेव बजेट स्मार्टफोन आहे ज्यावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे.

  • Share this:

अशा जगात जेथे स्मार्टफोन कंपन्या आपल्या प्रमुख ऑफरसह बाजारपेठ हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तेथे केवळ काहीजणच सार्वजनिक लक्ष वेधून घेतात. vivo U10 असा एक स्मार्टफोन आहे जो अशा लोकांसाठी बनविला आहे ज्यांना काहीतरी नवीन अनुभवण्याचा विचार आहे. vivo ने भारतात प्रथमच त्यांची U सीरीज सुरू केली. भारतात रिलीज होण्याच्या काही दिवसा अधीची वस्तुस्थिती पाहता, vivo U10 आता या शहरात एका चांगल्या कारणासाठी चर्चेचा विषय बनाला आहे.

vivo U10  वापरून पाहण्याची संधी मिळाल्यामुळे, बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये नवीन भर पडली आहे, आम्ही त्याची खास वैशिष्ट्ये ओळखली आहेत, ज्यामुळे आज ती बाजारपेठेत वेगळी दिसून येतात. आम्हाला असे वाटते की Vivo U10 त्याच्या बाजारातील अपेक्षांवर अवलंबून आहे.

डिझाइन आणि डिस्प्ले

vivo U10 मध्ये Halo FullView™, HD IPS 6.35 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे ज्याचा रेश्यो 19.5: 9 इतका आहे, स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 81.91% आणि 720 x 1544 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. 159.4 mm x 76.7 mm x 8.9 mm असलेल्या या स्मार्टफोनचे वजन 190.5 ग्रॅम इतके आहे. डिझाइनबद्दल बोलायचे झालेच तर या स्मार्टफोनच्या इलेक्ट्रिक ब्लू प्लास्टिक बॉडीची आकर्षक आणि ग्रेडियंट फिनिशिंग आहे, जो रंग मोरपंखी रंगा पासून तळाशी गडद निळ्या रंगात उपलब्ध आहे तसेच थंडर ब्लॅकमध्येही हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.

शिवाय, हा फोन हातात चांगला बसतो, ज्या मुळे तो दिसतो ही छान आणि वापरताना अत्यंत आरामदायकही वाटतो. याची अधिक साधी परंतु उत्कृष्ट डिझाइन असल्यामुळे पाहताच क्षणी तुम्हाला हा फोन आपल्याकडे आकर्षक करतो.

परफॉर्मन्स

vivo U10 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन फन टच ओएस 9 अँड्रॉइड 9 पाईवर चालतो, आणि चांगले कार्य करण्याचे वचन देतो. हा 3GB आणि 4 GB RAM आणि 32 GB आणि 64 GB स्टोरेजसह येतो. या फोनमध्ये नव्याने डाउनलोड केलेल्या अ‍ॅप्सवरून नेव्हिगेट करणे यापूर्वी इतके चांगले नव्हते. याचे एका ऍपवरून दुसर्‍या ऍपमध्ये परिवर्तन हे अधिक सुकर आहे आणि हा अखंड कार्यक्षम आढळतो.

बॅटरी लाइफ

आता, यातील एक वैशिष्ट्य असे आहे की जे प्रत्येकास उस्पुर्त करेल ते म्हणजे - बॅटरीचे आयुष्य. vivo U10 एक शक्तिशाली 5000mAh बॅटरीसह समर्थित फोन आहे जो 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. हा देशातील एकमेव स्मार्टफोन आहे. जो या किंमतीच्या श्रेणीमध्ये 18 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. तसेच, तुम्ही एकदमच घाईत असाल तर हा फोन 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 4.5 तासा एवढ्या टॉक टाइमचे ( कॉल टाइम ) वचन देतो जेणेकरुन आपण दिवसाचा शेवट होईपर्यंत फोनचा निश्चितपणे वापर करू शकता. ब्रँडच्या विक्रीचा हा मुख्य ड्रायव्हिंग पॉईंट आहे. आम्ही आपले लक्ष नक्कीच वेधले आहे ना?

दुसरीकडे, अल्ट्रा गेम मोड अपवादात्मकपणे उत्कृष्ट आहे. यामध्ये गेमिंग सन्दर्भातील भरपूर वैशिष्ट्ये आहेत. जसे की गेम काउंटडाउन, 4D वाइब्रैशन , लो ब्लू रे गेम आय प्रोटेक्शन इ. 5000 mAh बॅटरी मुळे आपण पाहिजे तोपर्यंत गेम खेळू शकता. इतर स्मार्टफोनच्या अगदी विपरीत, vivo U10 हा एक गेम खेळाचे आश्वासन देतो जे बरेच सफाईदार आणि अडथळा मुक्त आहे.

कॅमेरा वैशिष्ट्य / कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

एखादा स्मार्टफोनचा कॅमेरा काय ऑफर करतो आहे हे तपासल्याशिवाय कुणी कधीही खरेदी करत नाही. शेवटी, दिवसातुन एक तरी सेल्फी घेतल्याशिवाय कसे काय चालेल, बरोबर ना? कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, vivo U10 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो, ज्यामध्ये एफ / 2.2 अपर्चरसह 13 एमपी सेन्सर, एफ / 2.2 अपर्चरसह 8 एमपी वाइड-एंगल लेन्स, आणि बॅक साइड ला एफ / 2.4 अपर्चरसह पोर्ट्रेट शॉट्ससाठी 2 एमपी आहे. आता आपण रंग आणि पार्श्वभूमीच्या (कलर्स आणि बैकड्रॉपच्या) योग्य संतुलनासह आश्चर्यकारक अल्ट्रावाइड फोटो कॅप्चर करू शकता. तसेच यात एफ / 1.8 अपर्चरसह 8 एमपी फ्रंट कॅमेरा देखील आहे. दिलेल्या फोनच्या किंमतीत ह्या फोनने, विशेषत: टच टू फोकस, ऑटो फ्लॅश, डिजिटल झूम आणि फेस डिटेक्शन यासारख्या अंतर्गत वैशिष्ट्यांसह, कॅमेरा कार्यक्षमता अपेक्षाना निश्चितच ओलांडले आहे. आपल्याला इंस्टाग्रामिंग आवडत असल्यास, आपणास हा फोन तपासून पहाण्याची नक्कीच इच्छा होईल.

प्राइस पॉइंट

या डिव्हाइसच्या किंमतीबद्दल आपण नक्कीच चकित व्हाल. कारण हा फोन रुपये 8,990/- किंमतीचे वेरियंट 3 GB RAM आणि 32 GB अंतर्गत स्टोरेजसह देण्यात आला आहे. तर रुपये 9,990/- किंमतीचे वेरियंट 3 GB RAM आणि 64 GB अंतर्गत स्टोरेजसह देण्यात आला आहे.तथापि, आपल्यास 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज हवा असल्यास आपणास रुपये 10,990 /- द्यावे लागतील. बजेट वर्गात याच्या किंमतीने इतर स्मार्टफोपेक्षा लक्ष वेधून घेतले आहे.

निर्णय/ वर्डिक्ट

वैशिष्ट्यांमुळे, vivo U10 सध्या उद्योगातील स्पष्टपणे प्रतिस्पर्धी स्मार्टफोन आहे. हा काही अगदी अकल्पनीय वैशिष्ट्यांसह उपलब्ध करण्यात आलेला आहे. आम्ही याच्या आकर्षक डिझाइन आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल पूर्णपणे आश्चर्यचकित आहोत. यातील उत्तम भाग म्हणजे हा दिसण्यापूर्ति बजेट स्मार्टफोन नाही तर आपण यावर चांगला विश्वास ठेवू शकता.

Published by: Manoj Khandekar
First published: October 18, 2019, 12:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading