एनप्लसला टक्कर द्यायला विवोने लाँच केला Vivo S7e 5G; जाणून घ्या आकर्षक फिचर्स

एनप्लसला टक्कर द्यायला विवोने लाँच केला Vivo S7e 5G; जाणून घ्या आकर्षक फिचर्स

Vivo s7e लाँच झाला आहे. हा विवोचा पहिलावहिला 5G सपोर्ट करणारा फोन आहे. जाणून घेऊया याच्या आकर्षक फिचर्सबद्दल

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर: स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विवोने पहिलावहिला 5G फोन लाँच केला आहे. 11 नोव्हेंबरपासून Vivo S7e या  स्मार्टफोनच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. हा फोन वनप्लस आणि मोटोरोला टक्कर देईल. असं चित्र त्याच्या फिचर्समुळे सध्या दिसत आहे. Vivo S7eची किंमत अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही.

Vivo S7eचे फिचर्स काय?

MediaTek Dimensity 720 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे.

मिरर ब्लॅक, सिल्व्हर मून आणि फॅन्टम ब्लू या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबीचं स्टोअरेज देण्यात आलं आहे.

Vivo S7e या स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फूल एचडी डिस्प्ले मिळतो, स्क्रीन 1080x2400 पिक्सल

फोन अँड्रॉयड 10 सॉफ्टवेयरच्या Funtouch ऑपरेटिंग सिस्टम 10.5 बेस्ड सिस्टमवर काम करतो.

फोनमध्ये 4100mAhची बॅटरी देण्यात आली आहे.

Vivo S7e या फोनला 33 वॉटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

3.5mm चा ऑडिओ जॅक बसवण्यात आला आहे.

कसा आहे कॅमेरा?

Vivo S7e या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. 64 मेगापिक्सलचा कॅमेरासह  8 मेगापिक्सलचा सुपर वाइड अँगल मायक्रो सेन्सर आणि तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. त्यामुळे तुम्हाला सेल्फी काढायची आवड असेल तर हा फोन तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. सध्या 5G मोबाईल्सचा जमाना आला आहे. त्यामुळे विवोचा हा नवा स्मार्टफोन आधीच बाजारात असलेल्या एनप्लस 10 वनसोबत आणि मोटोरोलाच्या नव्या 5 जी फोनच्या स्पर्धेत उतरणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 4, 2020, 11:13 PM IST

ताज्या बातम्या