सध्या व्हर्च्युअल रिअॅलिटी गेम्सकडे मुलांचा ओढा आहे. डोळ्यांवर व्हीआर हेडसेट लावून मुलं गेम खेळण्यात गुंग असतात. वास्तविक व्हिडिओ किंवा ऑनलाईन गेमिंचे दुष्परिणाम याआधीही समोर आले आहेत. मात्र तरीही गेमिंगची तरुणांमधली क्रेझ वाढतेच आहे. त्यामुळेच कंपन्या नवनवीन प्रकारचे गेम्स तयार करत आहेत. आता व्हर्च्युअल रिअॅलिटी गेम्समध्ये काम करणाऱ्या एका अमेरिकन कंपनीनं असा हेडसेट तयार केलाय, की तो हेडसेट खेळाडूला खरोखर मारू शकतो.
आधुनिक व्हर्च्युअल रिअॅलिटीचे जनक मानले जाणारे पाल्मर लकी यांनी एक व्हीआर हेडसेट तयार केला आहे. त्याचं नाव NerveGear असं आहे. त्यांच्या ब्लॉगवर त्यांनी या हेडसेटबाबत माहिती दिली आहे. या हेडसेटच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला 3 एक्सप्लोझिव्ह चार्ज मोड्यूल्स आहेत. या हेडसेटला Sword Art Online अॅनिमेशनसाठी तयार करण्यात आलंय. यातल्या व्हीआर गेम सीरिजमध्ये एक वेडसर वैज्ञानिक सगळ्या खेळाडूंना ताब्यात घेतो, असं त्या गेमचं स्वरुप आहे. खेळासाठी अशा ग्राफिक्सचा वापर करण्यात आलाय, की ज्यामुळे खेळाडूला प्रत्यक्ष खेळ खेळत असल्यासारखं वाटतं. यातली भयंकर गोष्ट या पुढे घडते. या गेममध्ये खेळाडू मेला, तर तो खऱ्या आयुष्यातही मरू शकतो. या हेडसेटवरचे 3 मोड्युल्स खेळाडूच्या मेंदूवर शक्तिशाली मायक्रोवेव्हजचा मारा करतात. यामुळे खेळाडूचा जीव जाऊ शकतो. हा हेडसेट घालून गेम खेळल्यावर खेळाडूंना ते सर्व खरंच वाटू लागतं. मात्र खेळात मेल्यावर तो हेडसेट खेळणाऱ्यावर मारा करू शकतो.
हेही वाचा - 'या' तगड्या स्मार्टफोनवर तब्बल 31,500 रुपयांपर्यंत मिळणार सूट, अजिबात सोडू नका सुवर्णसंधी
आतापर्यंत व्हिडिओ गेम किंवा ऑनलाईन गेम्समुळे मुलांच्या डोळ्यांना धोका निर्माण होत होता. तसंच मुलांच्या मेंदूवरही परिणाम होत होते. काही घटनांमध्ये गेम्समध्ये हरल्यामुळे मुलांनी आत्महत्याही केल्या आहेत. आता तर थेट हल्ला करून मुलांना मारणारा व्हीआर हेडसेट तयार झाला आहे. आत्तापर्यंत काल्पनिक जगातली पात्र खऱ्या जगात येऊन माणसांना त्रास देऊ लागतात, हे केवळ चित्रपटांमध्येच घडत होतं. मात्र आता ते प्रत्यक्षात घडू शकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकन कंपनीनं तयार केलेला हा व्हीआर हेडसेट घालून गेम खेळताना खेळाडू मेला, तर तो हेडसेट त्याला खरोखर त्रास देऊ लागेल.
हेही वाचा - एक लाख किलोमीटर अंतर चालल्यानंतर कारच्या सर्व्हिससाठी जास्त खर्च का लागतो? जाणून घ्या कारण
व्हर्च्युअल रिअॅलिटी म्हणजे आभासी वास्तव. कॉम्प्युटरच्या तंत्रज्ञानाद्वारे स्क्रीनवर वास्तवाप्रमाणे चित्र निर्माण करणं त्या आभासी जगात 360 अंशांच्या कोनात फिरता येतं. आपण त्या जगात खरोखरच फिरतो आहोत, असं व्हीआर हेडसेट घातल्यावर वाटतं. या तंत्रज्ञानाचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये केला जातो आहे. तसंच गेमिंगमध्येही व्हीआर लोकप्रिय झालं आहे. व्हीआर हेडसेट्स महाग असतात पण ते तंत्रज्ञान स्वस्त होऊन काही वर्षांनी घरोघरी पोहोचलं तर वास्तवात काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Technology