Home /News /technology /

विराटने ऑडी क्यू 8 कार लाँच होताच 24 तासांत केली खरेदी, किंमत वाचून व्हाल थक्क

विराटने ऑडी क्यू 8 कार लाँच होताच 24 तासांत केली खरेदी, किंमत वाचून व्हाल थक्क

ऑडी क्यू 8 कार खरेदी करणारा विराट भारतातील पहिलाच व्यक्ती ठरला आहे.

    नवी दिल्ली, 16 जानेवारी : भारताचा कर्णधार विराट कोहलीने Audi Q8 ही कार खरेदी केली आहे. ऑडी क्यू 8 कार खरेदी करणारा तो भारतातील पहिलाच व्यक्ती ठरला आहे. ऑडीने ही कार बुधवारी 15 जानेवारीला लाँच केली होती. त्यानंतर 24 तासातच विराटने ही कार खरेदी केली. ऑडी क्यू 8 या कारची किंमत 1 कोटी 33 लाख रुपयांपासून सुरू होती. विराट कोहलीने ही कार खरेदी केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. पत्नी अनुष्का शर्माला गिफ्ट देण्यासाठी ही कार खरेदी केली असल्याचंही म्हटलं जात आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली भारताच्या ए प्लस श्रेणीतील क्रिकेटपटू आहे. बीसीसीआय़ने नुकताच वार्षिक करार जाहीर केला. ए प्लस श्रेणीत तीन खेळाडू असून त्यामध्ये विराट कोहलीचाही समावेश आहे. या करारानुसार बीसीसीआय़ त्याला एक वर्षासाठी 7 कोटी रुपये मिळणार आहेत. विराटला आयसीसीने खिलाडुवृत्तीबद्दल स्पिरीट ऑफ द इयर पुरस्काराने गौरवलं आहे. वर्ल्ड कपवेळी ओव्हलवर त्याने स्टीव्ह स्मिथला डिवचणाऱ्या प्रेक्षकांना गप्प केलं होतं. त्यानंतर त्याला डिवचू नका तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवा असं सांगितलं होतं. विराटच्या त्या कृतीने जगभरातील क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले होते. कमी किमतीत जास्त मायलेज देणारी honda Activa 6G लाँच
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Audi, Virat kohli

    पुढील बातम्या