मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Vi ने मुंबईतील ग्राहकांना दिली अनोखी ऑफर, 3G सिम कार्ड देऊन 4G कार्ड मिळणार मोफत

Vi ने मुंबईतील ग्राहकांना दिली अनोखी ऑफर, 3G सिम कार्ड देऊन 4G कार्ड मिळणार मोफत

व्होडाफोन आयडियाचे मुंबईतील ऑपरेशन्स डायरेक्टर राजेंद्र चौरसिया यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

व्होडाफोन आयडियाचे मुंबईतील ऑपरेशन्स डायरेक्टर राजेंद्र चौरसिया यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

व्होडाफोन आयडियाचे मुंबईतील ऑपरेशन्स डायरेक्टर राजेंद्र चौरसिया यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

मुंबई, 28 डिसेंबर : ‘मुंबई शहरातील व्हीच्या (Vi Vodafone idea) 4G सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना अधिक चांगल्या दर्जाची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही 4G इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 2100 MHz च्या लेअरची भर घातली आहे. हा 3G स्पेक्ट्रमचा भाग आम्ही वापरत असून त्यामुळे 4G ग्राहकांना त्यांच्या घरात वेगवान इंटरनेट सुविधा मिळू शकेल,’ अशी माहिती व्होडाफोन आयडियाचे मुंबईतील ऑपरेशन्स डायरेक्टर राजेंद्र चौरसिया यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

‘आम्ही आमच्या 3G सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना ही विनंती करतो की त्यांनी जवळच्या व्ही स्टोअरमध्ये जाऊन मोफत आपलं 3G कार्ड देऊन 4G कार्डं घ्यावं आणि ViGIGAnet4G सेवेचा लाभ घ्यावा. सध्या 3G सेवा वापरणाऱ्या ग्राहकांनी 4G सिमकार्ड आणि 4G हँडसेट वापरला तर त्यांना वेगवान सेवा मिळणार आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.

‘2100 MHz स्पेक्ट्रम बँडच्या 5 MHz क्षमतेचा वापर केल्यामुळे मुंबईतील व्हीच्या ग्राहकांना वेगवान इंटरनेट अनुभवता येईल. या नव्या सुधारणेमुळे Vi GIGAnet 4G सेवेचं कव्हरेज वाढेल, नेटवर्कचा दर्जा सुधारेल आणि अधिक ट्रॅफिक पेलण्याची क्षमता वाढेल. मुंबईत व्ही कंपनी 2G सेवा देत राहणार आहे,’ असंही कंपनीने पत्रकात स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Mumbai, Vodafone, Vodafone idea tariff plan