मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /या डिजिटल कंपनीत नोकरीची संधी, 10 हजार जणांची होणार भरती

या डिजिटल कंपनीत नोकरीची संधी, 10 हजार जणांची होणार भरती

UST कंपनी दहा हजारांपेक्षा अधिक तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांची भरती करणार असून, यात 2 हजार जागा एंट्री-लेव्हल इंजिनीअरिंग पदासाठी असतील. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सायबर सुरक्षा, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, जावा, डेटा सायन्स आणि इंजिनीअरिंग या विषयातील लोकांना नोकरी मिळू शकणार आहे.

UST कंपनी दहा हजारांपेक्षा अधिक तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांची भरती करणार असून, यात 2 हजार जागा एंट्री-लेव्हल इंजिनीअरिंग पदासाठी असतील. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सायबर सुरक्षा, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, जावा, डेटा सायन्स आणि इंजिनीअरिंग या विषयातील लोकांना नोकरी मिळू शकणार आहे.

UST कंपनी दहा हजारांपेक्षा अधिक तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांची भरती करणार असून, यात 2 हजार जागा एंट्री-लेव्हल इंजिनीअरिंग पदासाठी असतील. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सायबर सुरक्षा, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, जावा, डेटा सायन्स आणि इंजिनीअरिंग या विषयातील लोकांना नोकरी मिळू शकणार आहे.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : नोकरीच्या शोधात असलेल्या आयटी क्षेत्रातील (IT) लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यूएसटी (UST) या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन्स कंपनीने (Digital Transformations Solutions Company) यंदा भारतासह (India) जगभरातील त्यांच्या कार्यालयांमध्ये तब्बल 10,000 पेक्षा अधिक नवीन कर्मचारी (New Employee) नोकरीवर घेण्याची घोषणा केली आहे. UST ग्राहकांना मानव-केंद्रित दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या व्यवसायात बदल करण्यासाठी मदत करणार आहे. त्यादृष्टीने कंपनीने ही कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीने एक निवेदन जारी केलं आहे.

  UST कंपनी दहा हजारांपेक्षा अधिक तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांची भरती करणार असून, यात 2 हजार जागा एंट्री-लेव्हल इंजिनीअरिंग पदासाठी असतील. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सायबर सुरक्षा, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, जावा, डेटा सायन्स आणि इंजिनीअरिंग या विषयातील लोकांना नोकरी मिळू शकणार आहे. अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मॉडर्नायझेशन, AI/ML, ऑटोमेशन (RPA/IPA) याचं ज्ञान असणं हे मुख्य कौशल्य ठरेल.

  याबबत ‘यूएसटी’चे जॉइंट चीफ ऑपरेटिंग ऑफिसर मनू गोपीनाथ यांनी सांगितलं, की ‘आमचे नवीन कर्मचारी नवीन तंत्रज्ञानावर काम करतील आणि अशी उत्पादनं विकसित करतील जी आमच्या ग्राहक कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांना मदत करण्यासाठी उपयुक्त ठरतील. कंपनीची सध्याची उत्पादनं आणखी विकसित करण्यासाठीही हे नवीन कर्मचारी काम करतील. आमच्या उत्पादनांची मागणी वाढेल असे प्लॅटफॉर्म्स निर्माण करण्याची त्यांच्यावर जबाबदारी असेल.’

  या देशांमध्ये होईल भरती -

  ही नवीन कर्मचारी भरती प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोपसह आशिया पॅसिफिक देशांमध्ये केली जाणार आहे. आशिया पॅसिफिक देशांमध्ये भारत, इस्रायल, मलेशिया आणि सिंगापूर येथून कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. तर युरोपमधील ब्रिटन, स्पेन, जर्मनी, बल्गेरिया, रोमानिया, युक्रेन, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड आदी विविध देशांमध्ये ही भरती केली जाणार आहे. मात्र, कोणत्या देशात किती कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल याची माहिती कंपनीने दिलेली नाही.

  Job Alert: ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी

  26 हजार कर्मचारी कार्यरत -

  सध्या यूएसटी 25 देशांमध्ये कार्यरत असून कंपनीची एकूण 35 कार्यालयं आहेत. त्यामध्ये सुमारे 26 हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आता डिजिटल सोल्युशन्सची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीला कर्मचाऱ्यांची संख्या 40 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. यासाठी दहा हजार तंत्रज्ञान क्षेत्रातील पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.

  Job Alert: टपाल जीवन विमा मुंबई 10वी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार नोकरी

  निवड प्रक्रिया -

  UST मध्ये निवड होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना 100 तासांच्या विशिष्ट कौशल्य कार्यक्रमामधून (Skill Program) जावं लागतं. नवनिर्मितीवर कंपनीचा भर असल्याने कंपनी आपल्या ग्राहकांना त्यांच्या अडचणी दूर करणारी इनोव्हेटीव्ह सोल्युशन्स पुरवते. त्यामुळे अशी सोल्युशन्स निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्यं असलेल्या उमेदवारांची निवड केली जाते. कंपनी काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अत्यंत उत्तम वातावरण देते. फ्लेक्सिबल आणि हायब्रिड वर्कप्लेस कल्चरमुळे कंपनी भारत, यूके, मेक्सिको आणि यूएसमध्ये ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ साठी (Great Place to work) ओळखली जाते, असं कंपनीच्या मुख्य संयुक्त अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे.

  First published:

  Tags: Job alert, Tech news