मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Twitter वर करता येणार Blue Tick साठी अर्ज, असं करा अप्लाय

Twitter वर करता येणार Blue Tick साठी अर्ज, असं करा अप्लाय

आता Twitter ने वेरिफिकेशन प्रोसेस सुरू केली आहे. कंपनीने काही दिवसांपासून यासाठी अ‍ॅप्लिकेशन प्रोसेस थांबवली होती. परंतु आता पुन्हा ब्लू टिकसाठी युजर्स अप्लाय करू शकतात.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : मायक्रो ब्लॉगिंग साइट Twitter ने युजर्सला ते पुन्हा एकदा ब्लू बॅज (Twitter Blue Badge) अर्थात ब्लू टिकसाठी अप्लाय करू शकत असल्याचं सांगितलं आहे. कंपनीने काही दिवसांपासून यासाठी अ‍ॅप्लिकेशन प्रोसेस थांबवली होती, जेणेकरुन यात काही सुधारणा केल्या जातील. परंतु आता पुन्हा ब्लू टिकसाठी युजर्स अप्लाय करू शकतात.

Twitter ने अ‍ॅप्लिकेशन प्रोसेस आणि रिव्ह्यू प्रोसेस अधिक वेगवान करण्यासाठी कंपनीने ही प्रक्रिया थांबवली होती. यामागे कंपनीने कारणही सांगितलं आहे. जुलैमध्ये कंपनीने चुकून फेक अकाउंटला वेरिफाय केलं होतं. आपली ही चूक लगेच कंपनीने मान्यही केली होती. त्यानंतर ती अकाउंट्स कायमसाठी सस्पेंड केली गेली. हे सस्पेंशन मॅन्युपुलेशन आणि स्पॅम पॉलिसीअंतर्गत केलं गेलं होतं.

आता Twitter ने पुन्हा वेरिफिकेशन प्रोसेस सुरू केली आहे. Blue Tick असल्याने युजर्सला ऑथेंटिक अकाउंटची माहिती मिळते. वेरिफिकेशनसाठी अकाउंट नोटेबल आणि Active असणं गरजेचं आहे.

आता WhatsApp वरच तपासा Bank Balance, जाणून घ्या सोपी प्रोसेस

कसं कराल अप्लाय -

- Twitter वर वेरिफिकेशनसाठी अप्लाय करण्यासाठी Setting मध्ये जावं लागेल.

- इथे Request Verification हा पर्याय मिळेल.

- इथूनच Blue Tick साठी अप्लाय करता येईल.

- जर हा पर्याय अद्यापही मिळाला नसेल, तर यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागू शकते.

GPay वर केवळ 2 मिनिटांत काढा Online FD, पाहा सोपी प्रोसेस

एकदा अ‍ॅप्लिकेशन सबमिट केल्यानंतर, ट्विटर काही दिवसांमध्ये ईमेलद्वारे रिप्लाय करेल. यासाठी काही आठवडेही लागू शकतात. जर तुमचं अ‍ॅप्लिकेशन अप्रुव्ह झालं, तर तुमच्या प्रोफाईलजवळ ब्लू टिक दिसू लागेल. जर अप्रुव्ह झालं नाही, तर याची माहिती दिली जाईल. अप्रुव्ह न झाल्यास, 30 दिवसांनंतर पुन्हा ट्विटर वेरिफिकेशनसाठी अर्ज करू शकता.

First published:

Tags: Twitter, Twitter account