बंदी असलेल्या Porn साइट पाहण्यासाठी नेटकऱ्यांचा नवा फंडा, अॅक्सेसचे प्रमाण वाढले

बंदी असलेल्या Porn साइट पाहण्यासाठी नेटकऱ्यांचा नवा फंडा, अॅक्सेसचे प्रमाण वाढले

सरकारकडून जरी 875 पॉर्न साइटवर बंदी घालण्यात आली असली तरी त्या साइट अॅक्सेस करण्यासाठी नवा फंडाही नेटकऱ्यांनी शोधला आहे.

  • Share this:

मुंबई, 07 डिसेंबर : इंटरनेटवर इतकी माहिती उपलब्ध आहे की एका चुटकीसरशी काही शोधलं की हजारो-लाखो पर्याय मिळतात. आता कोण काय सर्च करेल हे सांगता येत नाही. दरम्यान, इंटरनेटवर वाढत्या पॉर्न वेबसाइट आणि त्याच्या अॅक्सेसबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर केंद्र सरकारनं तब्बल 857 वेबसाइट बंद केल्या आहेत. याबद्दल दूरसंचार विभागानं देशातील मुख्य इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्यांना पत्र लिहून वेबसाइट बंद करण्याचे आदेश दिले होते. घटनेतील कलम 19(2) नुसार संबंधित वेबसाइट्स अनैतिक आणि अश्लील असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, सरकारकडून जरी बंदी घालण्यात आली असली तरी त्या साइट अॅक्सेस करण्यासाठी नवा फंडाही नेटकऱ्यांनी शोधला आहे. सरकारच्या निर्णयावर नाराजीही नेटकऱ्यांनी व्यक्त केली होती. आता वर्च्युअल प्रायवेट नेटवर्कचा वापर करून अशा वेबसाइट अॅक्सेस केल्या जात आहेत. यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

पॉर्न साइट्सवर बंदी घातल्यानंतर रिलायन्स जिओ, एअरटेल, आयडिया या कंपन्यांनीदेखील पॉर्न साइट्सचा अॅक्सेस बंद केला. त्यानंतर युजर्सनी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, प्रॉक्सी यांचा वापर करून या साइट अॅक्सेस करण्यास सुरुवात केली आहे.

मोबाइलवर अॅप डाऊनलोड केल्यानंतर या साइट्स सहजपणे अॅक्सेस होतात. या अॅप्सचा वापर करणाऱ्यांची संख्या तब्बल 5 कोटी 70 लाख इतकी झाली आहे. लंडनमधील टॉप टेन व्हीपीएन या कंपनीने ही आकडेवारी सांगितली आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये बंदी घातल्यानंतर एका महिन्याच्या आत अॅप डाऊनलोडचं प्रमाण वाढलं आहे.

Published by: Suraj Yadav
First published: December 7, 2019, 1:31 PM IST
Tags: porn

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading