Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करताना आधी लावावा लागणार 0; सरकारनं का केला बदल?

लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करताना आधी लावावा लागणार 0; सरकारनं का केला बदल?

प्लानमध्ये काय फरक आहे : 1 रुपयाचं अंतर असणाऱ्या या प्लानमध्ये वैधतेचा फरक आहे. 598 रुपयांच्या प्लानची वैधता अर्थात व्हॅलिडिटी 56 दिवस आहे. तर 599 प्लानची व्हॅलिडिटी 84 दिवस आहे. दोन्ही प्लानमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा फरक आहे. 599 रुपयांच्या प्लानमध्ये, केवळ 1 रुपया अधिक खर्च करून 28 दिवसांची व्हॅलिडिटी वाढवता येईल. त्यामुळे कोणताही मोबाईल रिचार्ज करताना, बारकाईने लक्ष देऊन, कोणत्या प्लानमध्ये कोणते आकर्षक प्लान लपले आहेत ते पाहूनच त्याची निवड करा.

प्लानमध्ये काय फरक आहे : 1 रुपयाचं अंतर असणाऱ्या या प्लानमध्ये वैधतेचा फरक आहे. 598 रुपयांच्या प्लानची वैधता अर्थात व्हॅलिडिटी 56 दिवस आहे. तर 599 प्लानची व्हॅलिडिटी 84 दिवस आहे. दोन्ही प्लानमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा फरक आहे. 599 रुपयांच्या प्लानमध्ये, केवळ 1 रुपया अधिक खर्च करून 28 दिवसांची व्हॅलिडिटी वाढवता येईल. त्यामुळे कोणताही मोबाईल रिचार्ज करताना, बारकाईने लक्ष देऊन, कोणत्या प्लानमध्ये कोणते आकर्षक प्लान लपले आहेत ते पाहूनच त्याची निवड करा.

लँडलाइनवरून (landline) मोबाईल (mobile) क्रमांक डायल करताना आधी शून्य (zero) लावला नाही तर फोन लागणार नाही.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करायचा असेल तर मोबाईल क्रमांकाआधी शून्य (Zero) लावणं आवश्यक आहे. अन्यथा तो फोन लागणार नाही. दूरसंचार विभागानं टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया (Telecom Regulatory Authority of India) अर्थात ट्रायच्या (TRAI) शिफारशीचा स्वीकार करत हा नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. लँडलाईन आणि मोबाईल सेवा यासाठी पुरेसे क्रमांक उपलब्ध व्हावेत या दृष्टीनं केंद्र सरकारनं हे पाऊल उचललं आहे. 15 जानेवारीपासून संपूर्ण देशात हा नियम लागू होईल. जे लोक मोबाईल क्रमांक डायल करण्यापूर्वी शून्य लावणार नाहीत त्यांना त्या संदर्भातील सूचना देणारा रेकोर्डेड मेसेज ऐकू येईल.

भारतात दहा अंकी मोबाईल क्रमाकांचा वापर होतो. शून्य आणि एकने सुरू होणारे क्रमांक खास सेवांसाठी वापरले जातात. यामुळे पूर्वी सर्वसाधारणपणे मोबाईल क्रमांक 9 ने सुरू होत असत. आता  8, 7 आणि 6 पासून सुरू होणारे मोबाईल क्रमांकही येण्यास सुरुवात झाली आहे. या अंकांच्या सर्व क्रमांकांचा विचार केला तर देशात सध्या 115 कोटी मोबाईल क्रमांक उपलब्ध आहेत. मात्र 9 पासून सुरू होणारे क्रमांक जवळपास संपले आहेत. आता यापुढे 9 पासून सुरू होणारे आणखी मोबाईल क्रमांक देता येणं शक्य नाही. ही समस्या दूर करण्यासाठी मोबाईल क्रमाकांच्या आधी 0 लावण्याची पद्धत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फोन क्रमांक डायल करण्याच्या पद्धतीत बदल करण्याबाबत काढण्यात आलेल्या एका परिपत्रकात दूरसंचार विभागाने लँडलाईन आणि मोबाईल सेवा यासाठी पुरेसे क्रमांक उपलब्ध व्हावेत याकरता 29 मे 2020 रोजी ट्रायने केलेली सूचना स्वीकारण्यात आल्याचं नमूद केलं आहे. सर्व लँडलाईन सेवा पुरवठादारांना ग्राहकांना शून्य डायलिंगची सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. ही एसटीडी डायलिंग सेवा आहे.

हे वाचा - PUBG Mobile India ला मिळाली सरकारची परवानगी, 'या' तारखेला होणार लॉंच

या नवीन नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी दूरसंचार विभागानं (communications ministry) कंपन्यांना एक जानेवारी 2021 पर्यंत आवश्यक त्या यंत्रणा सुसज्ज करण्याचे आदेश दिले आहेत. या बदलामुळे दूरसंचार सेवांसाठी आवश्यक त्या प्रमाणात क्रमांक उपलब्ध होऊ शकणार आहेत.  मोबाईलवरून मोबाईलवर कॉल करण्यासाठी हा नियम लागू नाही. म्हणजे मोबाईलवरून फोन करत असाल तर त्यावेळी मोबाईल क्रमांकाआधी शून्य लावण्याची गरज नाही.

हे वाचा - Paytm पोस्टपेडच्या युझर्ससाठी भन्नाट ऑफर; महिन्याच्या बिलासाठी EMIचा पर्याय

ट्रायने सिमकार्ड आधारित एम टू एम कनेक्शन्ससाठी दहा अंकांच्या मोबाईलक्रमांकाऐवजी 13 अंकांच्या मोबाईल क्रमांकाचा सल्ला दिला होता. 31 ऑगस्ट 2o2o पर्यंत देशात 114 कोटी 79 लाख मोबाईल युजर्स होते. ही संख्या सातत्यानं वाढत आहे तर दुसरीकडे लँडलाईन युझर्सची संख्या कमी होत चालली आहे. काही क्रमाकांची मालिका फक्त लँडलाईन ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. जसं २ पासून सुरू होणारी मालिका बीएसएनएल आणि एमटीएनएलसाठी, 4 अंक एअरटेलसाठी, 35 आणि 796 रिलायन्स जिओच्या लँडलाईन ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. भविष्यातील गरज ओळखून ही शून्य लावण्याची पद्धत आणण्यात आली आहे. ज्यामुळे लँडलाईन आणि मोबाईल क्रमांक एकसारखे असण्याची अडचण दूर होणार नाही तर नवीन 253 कोटी 9 लाख क्रमांकही उपलब्ध होतील.

First published:

Tags: Mobile, Technology