मुंबई, 12 नोव्हेंबर: गुगल (Google)वर एकदा फोटो सेव्ह केले की बघायला नको. आपले फोटो सेफ राहतील, असं तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा कारण गुगलने युझर्ससाठी नवं अपडेट आणली आहे. (Google might delete your content) गुगलची जी अकाऊंट्स अनेक वर्षांपासून वापरात नाहीत ती अकाऊंट्स डिलीट करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. ज्या युझर्सचं अकाऊंट गेल्या 2 वर्षांपासून वापरात नाही, ते अकाऊंट आपोआप डिलीट होणार आहे. अकाऊंट डिलीट होणार म्हटल्यावर तुमचे मेल्स, फोटो, व्हिडीओ, ड्राईव्ह सगळंच डिलीट होणार आहे. तसंच जे जीमेल ड्राईव्हवर स्टोअरेज कॅपसिटीची लिमीट क्रॉस करत आहेत त्या युझर्ससाठीही हे नवं धोरण लागू होणार आहे.
गुगलचा नवा नियम काय?
तुमच्या अकाऊंटमध्ये स्टोअरेज लिमीट जास्त असेल तुमचे व्हिडीओ, फोटो, मेल्स आणि इतर डेटा गुगल आपोआप डिलीट करू शकतो. पण त्या आधी युझर्सना तशी सूचना दिली जाणार आहे. युझर्सना त्यांचं अकाऊंट सक्रिय ठेवायचं असेल तर त्यांच्यासाठी सोपा उपाय आहे. अधेमधे तुमचं वापर नसलेलं अकाऊंटही ओपन करुन बघत जा. नको असलेला डेटा स्वत:च डिलीट करा. यामुळे तुमचं अकाऊंटही वापरामध्ये येईल आणि डेटा डिलीट केल्यामुळे तुमची स्टोअरेज लिमीट वाढणार नाही.
Google one सर्व्हिस
जास्तीचं स्टोअरेज तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते विकतही घेऊ शकता. 15 जीबीपर्यंत तुम्हाला गुगलकडून स्टोअरेज मिळतं पण त्यापेक्षा जास्त स्टोअरेजची गरज असल्यास तुमचा स्टोअरेज प्लान अपग्रेड करता येईल. गुगल वन सर्व्हिसची पेड मेंबरशीपही घेता येईल. कंपनीने प्रो सेशनची सुरुवातही केली आहे. या माध्यमातून मेंबर्स गूगल एक्सपर्टसोबत वन-टू-वन संपर्क साधू शकतात, असंही कंपनीने स्पष्ट केलं. स्टोअरेज वाढवल्यामुळे फोनचा जास्तीचा डेटाही सेव्ह करता येईल. बुधवारी गुगलने त्यांच्या नव्या गाइडलाइन्सबद्दल ही माहिती दिली.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.