मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

व्हॉट्सअ‍ॅपमधले नको असलेले मेसेज डिलीट करण्यासाठी वापरा ‘या’ खास ट्रिक्स, स्टोअरेजवर देखील होईल परिणाम

व्हॉट्सअ‍ॅपमधले नको असलेले मेसेज डिलीट करण्यासाठी वापरा ‘या’ खास ट्रिक्स, स्टोअरेजवर देखील होईल परिणाम

त्यानंतर WhatsApp वर जाऊन त्या चॅटवर क्लिक करा, ज्यावर कॉल रेकॉर्ड करायचा आहे.

त्यानंतर WhatsApp वर जाऊन त्या चॅटवर क्लिक करा, ज्यावर कॉल रेकॉर्ड करायचा आहे.

हॉट्सअॅप चॅटमध्ये अनेक बिनकामाचे फोटोज, व्हिडिओज, डॉक्युमेंट्स असतात. आपण ते डिलीट केले नाही तर व्हॉट्सअॅप हँग होतं.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 20 जून : व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं सर्वांत लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. स्मार्टफोन वापरतोय आणि व्हॉट्सअॅप वापरत नाही, अशा व्यक्ती विरळाच. तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असालच. व्हॉट्सअॅपवर आपल्याला रोज असंख्य मेसेज येतात. ते सर्वच मेसेज आपण वाचतो असं नाही. त्यामुळे मेसेज वाचणं आणि ते एक-एक करून डिलीट करणं कठीण काम होऊन जातं. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनेक बिनकामाचे फोटोज, व्हिडिओज, डॉक्युमेंट्स असतात. आपण ते डिलीट केले नाही तर व्हॉट्सअॅप हँग होतं. यासाठी आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत. त्या ट्रिक्सचा वापर करून तुमचा फोनचा लोड कमी करू शकता. याबाबत झी न्यूजने वृत्त दिलंय.

'हे' फीचर करा डिसेबल

WhatsApp स्टोरेज वाढलं की फोन स्टोरेज वाढतं. स्पेस कमी झाल्यास फोन स्लो होतो. त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅपमध्ये मीडिया फाइल्सचा ऑटो सेव्ह ऑप्शन डिसेबल करू शकता. असं केल्यास तुम्हाला हव्या असलेल्या फाइल्सच फक्त तुमच्या फोनमध्ये सेव्ह होतील आणि फोनमधली स्पेस वाढेल.

व्हॉट्सअॅप क्लीन करा -

- सर्वांत आधी WhatsApp ओपन करून सेटिंग्समध्ये जा.

- त्यानंतर डेटा आणि स्टोरेज युजवर टॅप करा.

- सर्वांत खाली तुम्हाला Storage Usage हा ऑप्शन दिसेल.

- त्यावर टॅप केल्यानंतर सर्व चॅटची लिस्ट समोर दिसेल.

- तिथे कोणत्या चॅटमध्ये किती स्टोरेज वापरलं जातंय ते तुम्हाला दिसेल.

- ज्या चॅटमधून तुम्हाला आयटम्स डिलीट करायचे असतील, त्या चॅटवर टॅप करा.

- यानंतर तुम्हाला फोटोज आणि इतर डॉक्युमेंटची लिस्ट दिसेल.

- या लिस्टमधून तुम्हाला नको असलेले आयटम्स तुम्ही डिलीट करू शकता.

- यामुळे तुमचं व्हॉट्सअॅप क्लीन होईल आणि स्पेस वाढेल.

आता येताहेत नवी फीचर्स

मिस्ड ग्रुप कॉल्स (Missed Group Calls)

WhatsApp अशा फीचरवर काम करतंय, की ज्यामुळे तुम्हाला मिस झालेल्या ग्रुप कॉल्समध्ये सहभागी होता येईल. त्यामुळे तुम्हाला ग्रुप कॉलमध्ये स्वतःहून सहभागी होण्याचा ऑप्शन मिळेल.

मल्टिपल डिव्हाइस सपोर्ट (Multiple device support)

व्हॉट्सअॅप गेल्या अनेक महिन्यांपासून Multiple device support या फीचरची चाचणी घेतंय. हे फीचर लवकरच युजर्ससाठी येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. WaBetaInfo यांच्या एका रिपोर्टनुसार येत्या दोन महिन्यांत Multiple device support हे फीचर सार्वजनिक बीटामध्ये समाविष्ट केलं जाईल.  ही सुविधा मिळाल्यानंतर तुम्ही एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर तुमचं व्हॉट्सअॅप अकाउंट लॉग इन करू शकता.

First published:

Tags: Whatsapp