तुम्हीही वापरू शकता फ्री इंटरनेट, दीड कोटी लोकांनी घेतला लाभ!

तुम्हीही वापरू शकता फ्री इंटरनेट, दीड कोटी लोकांनी घेतला लाभ!

ऑक्टोबर 2019 मध्ये जवळपास दीड कोटी लोकांनी फ्री इंटरनेटचा लाभ घेतला. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी केंद्रीय मंत्र्यांनी ही माहिती दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : रेल्वेकडून सातत्याने नवनव्या योजना आणि सेवा दिल्या जातात. आता रेल्वेने स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. तब्बल दीड कोटी लोक याचा लाभ घेत आहेत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं की, ऑक्टोबर 2019 मध्ये जवळपास दीड कोटी लोकांनी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर मोफत वायफायचा लाभ घेतला. राज्यसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

पीयूष गोयल यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेचे 6471 स्थानकांवर वायफाय सेवा पुरवण्याचा प्रस्ताव आहे. मार्च 2020 पर्यंत 5816 स्थानकांवर आणि मार्च 2021 पर्यंत उरलेल्या स्थानकांवर वायफाय सुविधा देण्याचे लक्ष्य असेल. डिसेंबर 2019 पर्यंत 5491 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफायची सुविधा देण्यात आली आहे. मोफत वायफायची सुविधा देण्यासाठी रेल्वेने काही दिवसांपूर्वी बदल केले आहेत.

याशिवाय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पीएनआर कनेक्ट करण्याची सुविधा दिली होती. यामुळे एक ट्रेन लेट झाली तर दुसरी ट्रेन सुटण्याच्या परिस्थितीत प्रवाशाला एका तिकिटाचे पूर्ण पैसे परत दिले जातात. मात्र, यासाठी रेल्वेच्या काही अटी आणि नियम आहेत. यानुसार दोन्ही तिकिटांवर प्रवाशांची संपूर्ण माहिती एकसारखी हवी. तसेच पहिल्या तिकिटाचे शेवटचे स्थानक आणि दुसऱ्या तिकिटाचे पहिले स्थानक एकच हवे.

तसेच रेल्वेने बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधाही दिली होती. यामध्ये ट्रेन सुटण्याआधी चार तास प्रवाशांना त्यांचे बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा देण्यात आली आहे. आता प्रवाशी चार्ट तयार होण्याआधी त्यांचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकतात. याचा फायदा जनरल कोट्यातून रिझर्व्हेशन करणाऱ्यांनाही होईल. तसेच तात्काळ बुकिंग करणाऱ्यांनाही होईल. तुम्हाला रेल्वेच्या साइटवर जाऊन हे करता येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2019 11:19 AM IST

ताज्या बातम्या