नवी दिल्ली, 16 मार्च : ऑटो टेक फर्म 'कारदेखो'ने (Car Dekho) एक अॅडव्हान्स आणि कॉम्पॅक्ट जीपीएस व्हिकल ट्रॅकिंग सिस्टम, लाँच केलं आहे. अपलिंक (Uplink) असं या ट्रॅकिंग सिस्टमचं नाव आहे. अपलिंक एक कॉम्पॅक्ट प्लग अँड प्ले डिव्हाईस आहे, जे कोणत्याही गाडीला कनेक्ट केलं जाऊ शकतं. यामुळे युजर्सला अनेक प्रकारची माहिती मिळते. या डिव्हाईसमुळे कार मालक लाईव्ह ट्रॅकिंग, रॅश ड्रायव्हिंग अलर्ट, ट्रिप्स हिस्ट्री, वाहन चालण्याची माहिती, फोन अलर्ट अशाप्रकारची अनेक माहिती मिळते. गाड्यांचे मालक आपली गाडी अपलिंकसह जोडून गाडी 24 तास सुरक्षित ठेवू शकतात. गाडीवर सतत लक्ष ठेवता येऊ शकतो.
कोणत्याही टेक्निशियनची गरज लागणार नाही -
अपलिंक टेलिमॅटिक्स यूनिट एक जीपीएस डिव्हाईस आहे, जो आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात मजबूत उपकरणांपैकी एक असल्याचा दावा करण्यात आला आहे. अपलिंकचं इन्स्टॉलेशनही सोपं आणि हिडन अर्थात कोणालाही समजणार नाही अशाप्रकारे आहे. प्लग अँड प्ले म्हणजे, याच्या इन्स्टॉलेशनसाठी कोणत्याही टेक्निशियनची गरज नाही. हे अँड्रॉईड (Android), आयओएस (ios)आणि वेब पोर्टलवर (web portal) योग्यप्रकारे डिझाईन केलेलं, युजरफ्री डिव्हाईस असल्याचं सांगण्यात आलं आहे.
'कारदेखो' ग्रुपचे टेक सोल्यूशन्सचे बिजनेस हेड सुशांत भट्ट यांनी सांगितलं की, सध्याच्या काळात टेक्नोलॉजी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. याच टेक्नोलॉजीचा वापर आपल्या मौल्यवान संपत्ती घर, गाडीसाठीही आता करता येत आहे. अपलिंक डिव्हाईस गाडीच्या मालकांना आपल्या गाडीशी 24 तास कनेक्ट ठेवण्यासाठी सक्षम आहे. 'कारदेखो' या आपल्या नावाप्रमाणेच आम्ही सुविधा देत असून या डिव्हाईसद्वारे मालक आपल्या गाडीवर पूर्ण लक्ष ठेऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Auto expo, Car, Tech news, Technology