मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

देशात महाग होऊ शकतं UPI Payment, जाणून घ्या काय आहे RBI चा प्लॅन; सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

देशात महाग होऊ शकतं UPI Payment, जाणून घ्या काय आहे RBI चा प्लॅन; सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंटवर शुल्क आकारण्याबाबत एक चर्चा पत्र जाहीर करेल. यावरुन येत्या काळात डिजिटल पेमेंटसाठी अतिरिक्त शुल्क भरावं लागणार असल्याची माहिती आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : भारतीय रिझर्व्ह बँकचे गवर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी चलनविषयक चौथी द्विमासिक बैठक घेतली. या बैठकीत रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रेपो रेट 4 टक्क्यांवर, रिवर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. मागील वर्षी मार्चमध्ये RBI ने रेपो रेटमध्ये 0.75 टक्के आणि मेमध्ये 0.40 टक्क्यांची कपात केली आहे. या कपातीनंतर रेपो रेट 4 टक्क्यांवर आला. या बैठकीत RBI गवर्नर शक्तिकांत दास यांनी डिजिटल पेमेंटबाबतही मोठी माहिती दिली.

डिजिटल पेमेंटमध्ये होऊ शकते वाढ -

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल पेमेंटवर शुल्क आकारण्याबाबत एक चर्चा पत्र जाहीर करेल. यावरुन येत्या काळात डिजिटल पेमेंटसाठी अतिरिक्त शुल्क भरावं लागणार असल्याची माहिती आहे. त्याशिवाय RBI, UPI आधारित फीचर फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

2016 मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर भारतात डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाली. त्यानंतर कोरोना काळात यात बरीच वाढ झाली. डिजिटल पेमेंटचा ग्राफ सतत वाढताच आहे.

एका रिपोर्टनुसार, Google Pay, Paytm, PhonePe आणि BHIM App सारख्या इतर UPI प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला जवळपास 1.22 बिलियन म्हणजेच जवळपास 122 कोटीपर्यंत व्यवहार झाले. 2016 सालच्या पाच वर्षाच्या आधीची तुलना केल्यास यात 550 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2016-17 मध्ये 1004 कोटींचं ट्रान्झेक्शन झालं आहे.

हा आकडा 2020-21 मध्ये 5,554 कोटींवर पोहोचला. 2021 च्या एप्रिल-मे महिन्यात डिजिटल ट्रान्झेक्शन 2020 च्या तुलनेत 100 टक्के वाढला आहे.

Google Pay Alert! 1 जानेवारीपासून बदलणार Online Payment चा हा नियम

काय आहे UPI?

यूपीआय अर्थात यूनिफाइड पेमेंट इंटरफेस एक डिजिटल पेमेंटचा पर्याय आहे, जो मोबाइल App द्वारे काम करतो. या App द्वारे सुरक्षित पद्धतीने पेमेंट करू शकता. पैसे अडकले तरी बँक खात्यात रिफंड होतं. यासाठी मोबाइलमध्ये App डाउनलोड करावं लागेल तसंच मोबाइल नंबर खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Online payments, Rbi, Tech news, Upi