मुंबई, 02 फेब्रुवारी : गुगलने गेल्या वर्षी आॅक्टोबर 2018मध्ये आपलं सोशल गुगल ( गुगल प्लस ) बंद करण्याची घोषणा केली होती. गुगल सपोर्ट पेजवर मिळालेल्या माहितीनुसार 2 एप्रिल 2019मध्ये Google चा कंझ्युमर वर्जन बंद केलं जाईल.
Google Plus बंद करण्याचा निर्णय 5 कोटींपेक्षा जास्त युजर्सचा डेटा असुरक्षित झाल्यावरच घेतला होता. एका आॅफिशियल पोस्टमध्ये कंपनीनं म्हटलं होतं की 2 एप्रिलला तुम्ही तयार केलेलं गुगल अकाऊंट किंवा गुगल प्लसचं कुठलही पेज बंद होईल. आम्ही युजर्सच्या गुगल प्लस अकाऊंटच्या काँटॅक्ट डिटेल्सना डिलिट करायला सुरुवात करू.
गुगल प्लसच्या Album Archieveमध्ये युजर्सचे फोटो आणि व्हिडिओज डिलिट केले जातील. युजरनं फोटो किंवा व्हिडिओचा बॅकअप घेतला असेल तर तो डिलिट होणार नाही.
युजर्स आताच हे व्हिडिओ, फोटो डाऊनलोड करून सेव्ह करू शकतात. गुगलनं सांगितलंय, 4 फेब्रुवारीपासून युजर्स या प्लॅटफाॅर्मवर गुगल प्लस अकाऊंट बनवू शकत नाही.
गुगल प्लस 2011मध्ये लाँच केलं होतं. ही गुगल सोशल नेटवर्किंगची साइट होती. सुरुवातीला 450 मिलियन युजर्स होते. मग ते 2015मध्ये ते 111 मिलियन म्हणजे 11 कोटी युजर्स होते. गुगल प्लस फारसं लोकप्रिय झालं नाही. आता ते बंदही होतंय.
VIDEO : तुम्ही राणीच्या बागेतला पुष्प महोत्सव पाहिला का?