सुरक्षित इंटरनेट बँकिंगसाठी या 10 गोष्टी विसरू नका

सुरक्षित इंटरनेट बँकिंगसाठी या 10 गोष्टी विसरू नका

ई बँकिंगमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. पण त्यासाठी काळजी घेणंही गरजेचं आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मार्च : हल्ली सगळ्यांकडेच स्मार्टफोन असतो. त्यामुळे मोबाइलवर बँकेचं अ‍ॅप असणं ही पण सर्वसाधारण गोष्ट. ई बँकिंगमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. पण त्यासाठी काळजी घेणंही गरजेचं आहे.

  1. विचारपूर्वक पासवर्ड ठेवा

सुरक्षित बँकिंगसाठी पासवर्ड हा महत्त्वाचा भाग आहे. सोपा पासवर्ड ठेवू नका. त्यात कॅपिटल स्माॅल अक्षरं, आकडे असं ठेवा. तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमची कुठलीही आवडती गोष्ट यांचा अजिबात उल्लेख पासवर्डमध्ये करू नका.

2. बँक अकाऊंटवर नजर ठेवा

नियमित बँक अकाऊंट तपासत जा. डेबिट, क्रेडिट झालेले पैसे, ट्रान्सफर या गोष्टींकडे लक्ष ठेवा. अकाऊंट स्टेटमेंट नियमित पाहात जा.

3. सुरक्षित नेटवर्क वापरा

बँक अकाऊंटसाठी कुठलंही नेटवर्क वापरू नका. अनोळखी ठिकाणचं वायफाय तर अजिबातच वापरू नका. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेची वेबसाइट ‘https’ यानं सुरू होत असेल तर तुमचं अकाऊंट सुरक्षित राहील.

4. बँकेचं नोटिफिकेशन सुरू ठेवा

तुमच्या खात्यात कुठलाही व्यवहार झाला की बँक नोटिफिकेशन पाठवते. तुम्ही जेव्हा अकाऊंट ओपन कराल, त्यानंतर येणाऱ्या अलर्ट मेसेजकडे लक्ष ठेवा.

5. नेहमी लाॅग आऊट करा

कधीही ई बँकिंगचे व्यवहार केल्यावर ताबडतोब लाॅग आऊट करा.

6. मल्टिफॅक्टर आॅथेन्टिकेशन

अनेकदा तुम्ही लाॅग इन करता तेव्हा बँक तुम्हाला टेक्स मेसेज पाठवत असते. प्रत्येक बँक फ्राॅड होऊ नये म्हणून ही काळजी घेत असते. त्याकडे लक्ष ठेवा.

7. फसव्या ईमेल्सपासून सावध

अनेकदा तुमचा ओटीपी, पासवर्ड मागणारे मेल्स येत असतात. बँक कधीही पर्सनल डिटेल्स मागत नाही. तेव्हा अशा मेल्सपासून सावध राहा.

8. अँटिव्हायरस साॅफ्टवेअर वापरा

तुमच्या कम्प्युटरमध्ये अँटिव्हायरस टाकाच. त्यानं तुमचा कम्प्युटर सुरक्षित राहतो. पर्यायानं बँक अकाऊंटही.

9. ओपरेटिंग सिस्टिम अपडेट करा

मोबाईलवर नेहमीच साॅफ्टवेअर अपटेडिंगचा मेसेज येत असतो. भले तो तुम्हाला बोअरिंग वाटेलही. पण अपडेट केल्यानं सुरक्षितता वाढते.

10. आॅफिशियल बँकिंग अ‍ॅप वापरा

बँकेचं आॅफिशियल  अ‍ॅप असतं. गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन ते डाऊनलोड करा. त्याचाच वापर करा.

First published: March 30, 2019, 3:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading