फोन बंद असला तरी Whatsapp Web करणार काम!

अनेक जण व्हॉट्सअ‍ॅप कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरही वापरतात. त्याला Whatsapp Web असं म्हणतात. Whatsapp Web साठी हे नवं फीचर येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 07:19 PM IST

फोन बंद असला तरी Whatsapp Web करणार काम!

मुंबई, 29 जुलै : व्हॉट्सअ‍ॅपचा वापर जगभरातून होत असताना त्याचा वापर अधिक सोयीस्कर करण्यासाठी करण्यासाठी एक नवं फीचर येत आहे. दर काही महिन्यांनी या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वेगवेगळे बदल होत असतात. आता व्हॉट्सअ‍ॅपचा वापर फक्त ऑनलाईन चॅटिंग करण्यासाठी राहिला नसून आता या अ‍ॅपच्या मार्फत ऑफिसची अनेक कामं काही मिनिटांत पूर्ण केली जातात. फाइल, डॉक्यूमेंट, लोकेशन, व्हिडिओ आणि इमेज पाठवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो.

सेल्फी काढल्याने नुकसान होत आहे पर्यावरणावर, जाणून घ्या काय आहेत परिणाम

त्यामुळे अनेकजण व्हॉट्सअ‍ॅप कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरही वापरतात. त्याला Whatsapp Web असं म्हणतात. त्यासाठी कॉम्प्युटर वरील स्क्रीनवर येणाऱ्या कोडला फोनच्या व्हॉट्सअ‍ॅपच्यामार्फत स्कॅन केलं जातं. त्यानंतर तुमच्या समोरील स्क्रीनवरही व्हॉट्सअ‍ॅप चालू होतं. मात्र हे वापरत असताना अनेकवेळा ते डिस्कनेक्ट होते. फोन सतत सुरू ठेवावा लागतो.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोनचं इंटरनेट कनेक्शन चालू ठेवावं लागतं. ‘बग्स’ म्हणजेच या काही तांत्रिक अडचणींवर आता व्हॉट्सअ‍ॅप काम करुन लवकरच एक अपडेट आणणार आहे. Whatsapp Webवर येणाऱ्या अपडेटमध्ये फोनचं इंटरनेट बंद असलं तरी ते कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर वापरता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व अपडेटची माहिती देणाऱ्या WABetaInfo या वेबसाइटने या नव्या अपडेटची माहिती दिली आहे.

Loading...

हेडफोन लावून गाणी ऐकता? तुम्हाला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याचं प्रमाण व्यावसायिक पातळीवर दिवसेंदिवस वाढत आहे. ते वापरत असताना QR Code ला स्कॅन करून फोनला चालू ठेवावे लागते. तरीही ते वारंवार डिस्कनेक्ट होत असतं. याविषयीच्या तक्रारी अनेकदा केल्या जातात. या तक्रारी लक्षात घेत Whatsapp Web साठी हे नवं फिचर येणार आहे. फोनचं इंटरनेट बंद ठेऊनही डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार आहे. हे फिचर नक्कीच सर्वांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

VIDEO: तुरुंगवारीनंतर एजाज खान गाऊ लागला मोदींची स्तुतीसुमने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 07:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...