मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

डिसेंबरमध्ये लाँच होणार ‘या’ नवीन कार, पाहा काय आहेत वैशिष्ट्यं

डिसेंबरमध्ये लाँच होणार ‘या’ नवीन कार, पाहा काय आहेत वैशिष्ट्यं

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

2022 हे वर्ष संपत आलं आहे, या महिन्याच्या शेवटी कोणत्या कार मार्केटमध्ये येणार आहेत त्याची काय वैशिष्ट्य आहेत ते माहिती आहे का?

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 1 डिसेंबर :  2022 हे वर्ष संपत आलं आहे आणि काही वाहन निर्माते त्यांची नवीन वाहनं लवकरच सादर करणार आहेत. या पैकी बहुतेक बीएमडब्ल्यू, मर्सिडीज-बेंझ, टोयोटा आणि मारुती सुझुकीच्या एसयूव्हीचा समावेश आहे. डिसेंबरमध्ये मार्केटमध्ये लाँच होणाऱ्या नवीन गाड्यांवर एक नजर टाकूया.

मर्सिडीज GLB

मर्सिडीज 2 डिसेंबर रोजी भारतात GLB SUV लाँच करणार आहे. मेक्सिकोहून सीबीयू म्हणून येण्यासाठी ही कार सज्ज झाली आहे. जीएलएसनंतर जीएलबी ही भारतातील दुसरी 7-सीटर मर्सिडीज असेल. तिचं इंटिरिअर जीएलएने प्रेरित आहे. जीएलबीमध्ये ड्युएल 10.25 इन्फोटेनमेंट लेआउट, पॅनोरॅमिक सनरूफ, दुसऱ्या रांगेत स्लायडिंग सीट्स आणि व्हॉइस कमांड यांसारख्या सुविधा मिळतील. जीएलबी भारतात तीन व्हेरियंटमध्ये येईल.

एंट्री-लेव्हल GLB 200, मिड-स्पेक GLB 220d आणि टॉप-ऑफ-द-लाइन GLB 220d 4Matic. GLB 200 पेट्रोल 163hp साठी 1.3-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येईल. यात सात-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असेल. तर GLB 220d ला 2.0-लिटर मधून 190hp पॉवर मिळते जी आठ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसाठी असतं.

सेकंड हँड कारसाठी इन्शुरन्स आवश्यक असतो का? जाणून घ्या अधिक माहिती

मर्सिडीज EQB

मर्सिडीज 2 डिसेंबर रोजी सात-सीटर EQB इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामुळे EQC आणि EQS नंतर भारतातील ब्रँडच्या EQ उप-ब्रँडमधली ती तिसरी EV ठरेल. इलेक्ट्रिक एसयूव्ही जीएलबी सारखेच आर्किटेक्चर शेअर करते. जागतिक स्तरावर, EQB दोन स्टेट्स ऑफ ट्युनमध्ये लाँच केली गेली आहे. एक 228hp, 390Nm ड्युएल-मोटर 300 4Matic मध्ये आणि दुसरी हाय पॉवर 292hp, 520Nm ड्युएल-मोटर 350 4Matic मध्ये. भारतात लाँच होणारी EQB 300 4Matic या व्हेरियंटमध्ये लाँच केली जाईल.

बीएमडब्ल्यू एक्सएम

एक्सएम प्लग-इन हायब्रिड V8 पॉवरट्रेनवालं पहिलं एम मॉडेल आहे, जे 653 hp आणि 800 Nm एकूण पॉवर आउटपुट देते. BMW ने हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह दिलं आहे, जे फोर व्हिल ड्राइव्ह आहे. लक्झरी SUV 80km पर्यंतच्या रेंजसह प्युअर EV मोडमध्येदेखील चालवली जाऊ शकते. XM ही आकारमानाच्या बाबतीत X7 सारखीच आहे. एक्सटिरिअर लूकमध्ये मोठ्या प्रमाणात इल्युमिनिटेड ग्रिल, स्प्लिट हेडलॅम्प सेट-अप आणि रिअरमध्ये व्हर्टिकल स्टॅक्ड एक्झॉस्ट आउटलेट्स आहेत. ही कार 10 डिसेंबर रोजी लाँच केली जाणार आहे.

कारवर Loan घेतलं तर करातून सूट मिळते का? काय सांगतो नियम

BMW X& Facelift

नवीन अपडेट केलेली X7 लक्झरी SUV आता पूर्णपणे नव्या डिझाईनमध्ये दिसेल. या कारने नवीन स्प्लिट हेडलॅम्प डिझाईनची सुरुवात केली होती. जे पूर्वी नवीन i7 आणि 7 सीरिज सेडानमध्ये दिसले होते. BMW च्या नवीन इन्फोटेनमेंट स्क्रीनच्या सुरुवातीसह इंटिरियरमध्ये एक प्रमुख अपडेटदेखील दिसणार आहे, ज्यामध्ये 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 14.9-इंच टचस्क्रीन, iDrive 8 सॉफ्टवेअर समाविष्ट आहे. हे सॉफ्टवेअर या पूर्वी ix आणि i4 मध्ये दिसले होते.

भारतात X7 हे xDrive 40i आणि xDrive 30d मध्ये लाँच केलं जाईल, ज्यामध्ये आधीचे 380hp, इनलाइन सहा-सिलेंडर पेट्रोल इंजिन असेल. तर नंतर 352hp, इनलाइन सहा-सिलेंडर डिझेल इंजिन असू शकेल. दोन्ही इंजिन 48V माइल्ड-हायब्रीड टेक्नॉलॉजीशी जोडले जातील आणि मानक म्हणून ऑल-व्हील ड्राइव्हसह 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असेल. ही कारदेखील 10 डिसेंबर रोजी लाँच केली जाईल.

BMW M340i

BMW X7 आणि XM सोबत अपडेटेड M340i मॉडेलदेखील लाँच केलं जाईल. अपडेटेड मॉडेलला पुन्हा थोडं नव्याने डिझाईन केलं गेलंय. फ्रंट एंड, स्लिमर एलईडी हेडलाइट्स, फ्रंट बंपरच्या दोन्ही टोकाला नवीन एअर व्हेंट्स आणि एक ट्विक्ड किडनी ग्रिल या बीएमडब्ल्यूमध्ये असण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. ही कार 10 डिसेंबर रोजी कंपनी लाँच करणार आहे.

अपडेटेड M340i लादेखील तेच 3.0-लिटर, इन-लाइन, सिक्स-सिलेंडर, टर्बो पेट्रोल इंजिन असेल, जे 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह 387hp आणि 500Nm टॉर्क निर्माण करतं. BMW च्या xDrive ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टिमद्वारे सर्व चार चाकांना पॉवर दिली जाईल.

करोडो रुपये किंमत, पण तरीही 'या' कारमध्ये का नसतात एअरबॅग्ज?

टोयोटा हायरायडर सीएनजी

नोव्हेंबरच्या सुरुवातीला टोयोटाने घोषणा केली होती की ते लवकरच त्यांच्या Hyryder SUV चे CNG व्हर्जन लाँच करणार आहेत. Hyryder CNG S आणि G या दोन ट्रिममध्ये ऑफर केली जाईल. यामध्ये मारुतीकडून घेण्यात आलेलं 1.5-लिटर K15C, चार-सिलेंडर इंजिन असेल जे आधीच Ertiga आणि XL6 CNG-स्पेक MPVs मध्ये आहे.

इंजिन पेट्रोल मोडमध्ये 103hp आणि 136Nm आणि CNG मोडमध्ये 88hp आणि 121.5Nm पॉवर निर्माण करेल, अशी शक्यता आहे. मात्र, टोयोटाने दिलेल्या माहितीनुसार ते बहुतेक CNG मॉडेल्सप्रमाणेच फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह लाँच केली जाईल. या कारमध्ये 26.10 किमी/किलोमीटर मायलेज मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published:

Tags: Car