आता दिवसाचा डेटा संपणार नाही, या 2 कंपन्या देत आहेत 'सुपर प्लॅन'

आता दिवसाचा डेटा संपणार नाही, या 2 कंपन्या देत आहेत 'सुपर प्लॅन'

कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोठ्या ऑफर देत आहेत. आता बीएसएनएल आणि एअरटेलनं जबरदस्त ब्रॉडबँड प्लॅन दिले आहेत.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : टेलिकम्युनिकेशन कंपन्यांमध्ये ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोठी स्पर्धा सुरु आहे. यात सरकारी कंपनी बीएसएनलसुद्धा मागे नाही. बीएसएनएल आता ब्रॉडबँड सर्विससोबतदेखील खास ऑफर देत आहे. देशात बीएसएनलचं मोठं ब्रॉडबँड नेटवर्क आहे. सध्या कंपनी फायबर टू द होम ही सेवाही देत आहे. बीएसएनलच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये डेटा लिमिट असतं. काही कंपन्या अनलिमिटेड डेटा देतात. आता बीएसएनलनेसुद्धा असे प्लॅन्स लाँच केले आहेत.

बीएसएनएलचा 849 रुपयांमध्ये फायबर ब्रॉडबँड प्लॅन Fibro 600GB अशा नावाने आहे. यामध्ये युजरला दर महिन्याला 600 जीबी डेटा ऑफर दिली जात आहे. प्लॅनमध्ये युजरला 50 एमबीपीएस स्पीड दिली जाणार असून FUP संपल्यावर 2 एमबीपीएस वेगाने नेट वापरता येईल. एकूण 600 जीबीपर्यंत डेटा वापरल्यानंतर हे स्पीड कमी होईल.

याशिवाय बीएसएनएलने युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगही दिलं आहे. 749 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक वर्षाची अॅमेझॉन प्राइम मेंबरशिपसुद्धा दिली जात आहे.

ग्राहकांसाठी बीएसएनएलशिवाय एअरटेलनेसुद्धा अनलिमिटेड प्लॅन आणला आहे. 999 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनवर युजर्सना दर महिन्याला 300 जीबी डेटा दिला जाणार आहे. तसेच युजर्सना 200 एमबीपीएस स्पीडने इंटरनेट मिळणार आहे. यात अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा असेल.

युजर्ससाठी हा प्लॅन 299 रुपये जास्त देऊन अनलिमिटेड डेटामध्ये कन्वर्ट करता येतो. यात एक वर्षासाठी अमेझॉन प्राइम, झी 5 च्या सबस्क्रिप्शनसह तीन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन दिलं जात आहे. एवढचं नाही तर या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सट्रीमचे सबक्रिप्शनही फ्री देण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2019 11:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...