मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

प्रत्येक SIM मध्ये कोपऱ्यात एक कट का असतो? कारण आहे खूप मनोरंजक

प्रत्येक SIM मध्ये कोपऱ्यात एक कट का असतो? कारण आहे खूप मनोरंजक

आपण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व सिमकार्डमध्ये एक गोष्ट सामाईक आहे, जी आपण सर्वांनी नोटीस केली असेल. प्रत्येक सिमचा एक कोपरा किंचित कापला आहे. असे का आहे? हे तुम्हाला माहीत आहे का?

आपण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व सिमकार्डमध्ये एक गोष्ट सामाईक आहे, जी आपण सर्वांनी नोटीस केली असेल. प्रत्येक सिमचा एक कोपरा किंचित कापला आहे. असे का आहे? हे तुम्हाला माहीत आहे का?

आपण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व सिमकार्डमध्ये एक गोष्ट सामाईक आहे, जी आपण सर्वांनी नोटीस केली असेल. प्रत्येक सिमचा एक कोपरा किंचित कापला आहे. असे का आहे? हे तुम्हाला माहीत आहे का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 31 ऑगस्ट : स्मार्टफोन असो किंवा फीचर फोन, आजच्या काळात प्रत्येकाकडे हा डिव्हाईस आहे. ज्याच्याकडे फोन आहे, त्याला सिमची (SIM) माहिती असलेच. सिम नसलेला कोणताही फोन फक्त एक डब्बा आहे. मात्र, ज्या वापरकर्त्यांनी अनेक वर्षांपासून सिम वापरलं आहे, त्यांना याबद्दल एक विशेष गोष्ट कदाचित माहित नसेल. आपण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व सिमकार्डमध्ये एक गोष्ट सामाईक आहे, जी आपल्या सर्वांनी पाहिली असेल. प्रत्येक सिमचा एक कोपरा किंचित कापला आहे. फोन कोणत्याही कंपनीचा असला तरी सिम मात्र तुम्हाला एकाच प्रकारचे पाहायला मिळतील. पण असे का? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

सिमची एक बाजू अशी का कापली जाते हे आपल्यापैकी फार कमी जणांना माहीत असेल. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल तर चिंता करू नका. आम्ही या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. सिमचा एक कोपरा कापलेला असतो, जेणेकरून सिम मोबाईल फोनमध्ये योग्य ठिकाणी ठेवता येईल. सिम उलटे आहे की सरळ हे ओळखण्यासाठी सिमचे डिझाईन अशा प्रकारे बनवले आहे. जर लोकांनी सिम उलटे ठेवले तर त्याची चिप खराब होण्याचा धोका असतो.

वाचा - प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असायलाच हवीत 'ही' अ‍ॅप्स, तुमचं काम करतील सोपं

सिम कार्ड कसे कार्य करते?

सिम कार्ड कोणत्याही मोबाईलमधील आत्मा आहे. त्याच्याशिवाय आपण कोणालाही संपर्क करू शकत नाही. SIM कार्डचा फुल फॉर्म Subscriber (S) Identity (I) Module (M) आहे. हे कार्ड ऑपरेटिंग सिस्टम (COS) चालवणारे एक एकीकृत सर्किट आहे जे आंतरराष्ट्रीय मोबाइल ग्राहक ओळख (IMSI) क्रमांक आणि त्याच्याशी संबंधित की सुरक्षितपणे संग्रहित करते. या क्रमांक आणि Key चा वापर मोबाइल टेलिफोनी उपकरणांवर (जसे की मोबाइल फोन आणि संगणक) ग्राहकांना ओळखण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी वापरली जाते. मोबाइल फोनमध्ये वापरल्या जाणार्‍या सिम कार्डची रुंदी 25 मिमी, लांबी 15 मिमी आणि जाडी 0.76 मिमी आहे.

नॅनो आणि मायक्रो सिममध्येही तेच तंत्रज्ञान

आता अनेक नवीन स्मार्टफोनमध्ये मायक्रो आणि नॅनो आकाराचे सिम आले आहेत. सिम कार्डचा आकार बदलला असला तरीही त्याचा मूळ कट मात्र तसाच आहे. सिम कार्डचा आकार बदलण्यामागे मोबाईलमध्ये कमी जागा व्यापली जावी हे एकच कारण आहे. त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्यांमध्ये आता पूर्वीच्या आकारामधील मोठे सिम वापरले जात नाही.

First published:

Tags: Smartphone