मुंबई, 23 जून- पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ती
(Gravitation Force) असल्याने येथे जीवन व स्थैर्य आहे. हेलियम वायू असलेले फुगे
(Helium Balloons) वगळता येथे प्रत्येक वस्तू जमिनीकडे आकर्षित होते. त्यामुळेच प्रत्येकजण चालू शकतो. पण अंतराळात मात्र गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्याने हवेत तरंगत राहावं लागतं. पृथ्वी वगळता कुठल्याही ग्रहावर अद्याप गुरुत्वाकर्षण शक्ती नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांची टीम जेव्हा अंतराळात पोहोचते तेव्हा सर्वजण हवेत तरंगत असल्याचं दृश्य आपण तेथील व्हिडिओमध्ये पाहतो.
अंतराळाची सैर ज्या व्यक्तींना करता येत नाही अशा सर्वांनाच तेथील जीवन आणि गुंतागुंतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. असाच एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर
(Twitter) व्हायरल झाला आहे. यात अंतराळामध्ये एखादा ओला टॉवेल पिळला तर पाणी खाली न पडता टॉवेलच्या आजुबाजूलाच कसं फिरत राहतं, हे दिसतंय. @wonderofscience या ट्विटर हँडलवरून शेअर झालेल्या व्हिडिओत हा प्रयोग करताना एक व्यक्ती दिसत आहे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना याबाबत माहिती पाहिजे होती म्हणून नासाकडून
(NASA) हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.
पाऱ्याप्रमाणे टॉवेलच्या बाजूला चिटकून राहतं पाणी
ग्रेड 10 म्हणजे 10 वीच्या विद्यार्थ्यांनी ‘ओला टॉवेल अंतराळात पिळल्यास काय होतं?’, असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर म्हणून सीएसए अंतराळ प्रवासी क्रिस हॅडफिल्ड यांनी स्पेस स्टेशनमध्ये शूट केलेला व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला. यात हॅडफिल्ड यांनी त्यांच्या खिशातून छोटा टॉवेल काढला व तो पाण्यात भिजवला. त्यानंतर टॉवेलला दोन्हीकडून पकडत पिळण्यास सुरूवात केली. टॉवलेमधील पाणी इकडे-तिकडे पडण्याऐवजी टॉवेलच्या चारही बाजूला साचले. टॉवेलमधून बाहेर पडणाऱ्या पाण्यातून बुडबुडे निघत होते. त्याचवेळी हॅडफिल्ड यांचे हात पूर्णत: ओले झाले होते.
हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोग
अंतराळवीराने (Astronaut) केलेला प्रयोग हा अमेरिकेतील लॉकव्ह्यू हायस्कूलच्या ग्रेड 10 च्या केंद्रा लेमके आणि मेरेडथि फॉल्कनर विद्यार्थ्यांनी डिझाईन केला होता. कॅनेडियन अंतराळ एजन्सीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय विज्ञान स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. हा व्हिडिओ ट्विटरवर येण्याआधी 2013 मध्ये युट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 1 कोटी 97 लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर ट्विटरवरही या व्हिडिओला 50 लाखांपेक्षा अधिक वेळा पाहिलं गेलं आहे.
(हे वाचा:VIDEO- ग्राहकांनी असं काही केलं की महिला वेटर झाली संतप्त; रेस्टॉरंटमध्येच धू धू धुतलं )
दरम्यान, अंतराळातील कुठल्या एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सातत्याने जगभरताली खगोलशास्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. पण शालेय विद्यार्थ्यांचं अंतराळाबद्दल असलेलं कुतूहल पाहून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर प्रयोगातून देण्यासाठी केलेला हा व्हिडिओ नक्कीच कौतुकास्पद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.