Home /News /technology /

New Traffic Rules: ट्रॅफिक नियम मोडल्यास होऊ शकतो लाखाभराहून अधिक दंड, पाहा काय आहे नियम

New Traffic Rules: ट्रॅफिक नियम मोडल्यास होऊ शकतो लाखाभराहून अधिक दंड, पाहा काय आहे नियम

वाहन चालवताना बेजबाबदारपणा केल्यास ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) तुमचं एक लाख रुपयांचं चालान कापू शकतात. त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवतना काळजीपूर्वक चालवणं गरजेचं आहे.

  नवी दिल्ली, 26 जानेवारी : वाहन चालवताना बेजबाबदारपणा केल्यास ट्रॅफिक पोलीस (Traffic Police) तुमचं एक लाख रुपयांचं चालान कापू शकतात. त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवतना काळजीपूर्वक चालवणं गरजेचं आहे. ट्रॅफिक नियमांचं पालन न केल्यास नव्या मोटर व्हीकल अॅक्टअंतर्गत (Motor Vehicle Act) तुमचं 1.41 लाख रुपयांहून अधिकचं चालान कापलं जावू शकतं. सुधारित मोटर कायदा - 2019 (New Motor Vehicles Act 2019- Amendment) लागू झाला आहे. नव्या नियमांतर्गत जर तुम्ही ट्रॅक चालवताना ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केलं, तर 1,41,700 रुपयांचं चालान भरावं लागू शकतं. सप्टेंबर 2019 मध्ये ओव्हरलोडिंगमुळे दिल्लीत राजस्थानातील एका ट्रकचं 1,41,700 रुपयांचं चालान कापलं होतं. त्यानंतर ट्रॅक मालकाने कोर्टात चालान जमा केलं होतं. कोणत्या नियमाच्या उल्लंघनावर किती दंड? ट्रॅक चालवताना तो ओव्हरलोड (Overload) झाल्यास 5000 रुपये दंड भरावा लागू शकतो. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) नसल्यास 10000 रुपये, फिटनेस सर्टिफिकेट नसल्यास 10000 रुपये, परमिट वॉयलेशनसाठी 10000 रुपयांचं चालान कापलं जावू शकतं. त्याशिवाय इन्शुरन्स नसल्यास 4000 रुपये, पोल्यूशन सर्टिफिकेट नसल्यास 10000 रुपये, बांधकाम सामान कव्हर न करता घेवून गेल्यास 20000 रुपये दंड भरावा लागू शकतो. त्याशिवाय ओवरलोडिंगवर ट्रॅफिक पोलीस 20000 रुपये दंड करू शकतात. तसंच सामान जितकं टन असेल, त्याला 2000 रुपयांनी गुणून दंड लावला जाईल.

  हे वाचा - Traffic Rule:...तर 23000 रुपये भरावा लागेल दंड,बाइक चालवताना हे नियम लक्षात ठेवा

  भरावा लागला होता 200500 रुपये दंड - नवे नियम लागू झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी राम किशन नावाच्या व्यक्तीचं 2 लाख 500 रुपयांचं चालान कापलं होतं. यात ओव्हरलोडसाठी 56000 रुपये सामिल होते. ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याने 5000 रुपये, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटसाठी 10000 रुपये, परमिट वॉयलेशनसाठी 10000 रुपये, इन्शुरन्ससाठी 4000 रुपये, पोल्यूशन सर्टिफिकेटसाठी 10000 रुपये चालान कापलं होतं.

  हे वाचा - जबरदस्त!200 फूट खोल दरीत कोसळूनही प्रवासी सुरक्षित,भारत निर्मित मजबूत कारची कमाल

  त्याशिवाय सामान कव्हर न करता अर्थात न बांधता घेवून जात असल्याने 20000 रुपये, सीट बेल्ट न लावल्याने 1000 रुपये चालान कापलं होतं. अशाप्रकारे एकूण 2,00,500 रुपयांचा दंड केला होता. चालकाने कोर्टात दंड भरुन आपला ट्रक परत घेतला होता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Traffic, Traffic Rules

  पुढील बातम्या