नवी दिल्ली, 9 एप्रिल : स्मार्टफोन जगतात एके काळी अग्रगण्य असलेली मोटोरोला कंपनी रेडमी-शाओमी अशा कंपन्यांमुळे मधल्या काळात थोडी मागे पडली होती. मात्र आता मोटोरोलाही (Motorola New Smartphone) एकापाठोपाठ एक दमदार आणि स्वस्त फोन लाँच करत आहे. नुकताच मोटोरोलाने आपला ‘मोटो जी22’ स्मार्टफोन (Moto G22 India Launch) भारतात लाँच केला आहे. अगदी कमी किमतीत चांगले फीचर्स असलेल्या फोनवर डिस्काउंटही दिला जातो आहे.
दहा हजारांच्या आत करू शकता खरेदी -
Moto G22 स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत (Moto G22 Price) 10,999 रुपये आहे. 13 एप्रिलपासून फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साइटवरून या फोनची विक्री केली जाईल. तुम्ही पहिल्याच दिवशी फ्लिपकार्टवरून हा फोन खरेदी केला, तर एक्सक्लुझिव्ह लाँच ऑफरअंतर्गत तुम्ही हा स्मार्टफोन अवघ्या 9,999 रुपयांना (Moto G22 Offers) खरेदी करू शकता. ही ऑफर केवळ 14 एप्रिलपर्यंत लागू असणार आहे. तसंच, यासाठी तुम्हाला आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा (Flipkart offer on Moto G22) वापर करावा लागणार आहे. यासोबतच हा स्मार्टफोन ऑनलाइन खरेदी करताना नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देण्यात आला आहे.
फीचर्स -
Moto G22 स्मार्टफोनला 6.5 इंची आयपीएस-एलसीडी डिस्प्ले दिला आहे. त्याचा रिफ्रेश रेट 90Hz असून, 1600x720 पिक्सल रिझोल्युशन आहे. स्क्रीन-टू-बॉडी रेशो 89.03 टक्के आहे. या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ती 20 वॉट टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट उपलब्ध आहे. विशेष म्हणजे एवढी मोठ्या क्षमतेची बॅटरी असूनही हा स्मार्टफोन (Moto G22 Features) बराच स्लिम आहे.
या स्मार्टफोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक, अॅम्बियंट लाइट सेन्सर, अॅक्सेलरोमीटर सेन्सर असे फीचर्स (Moto G22 Specifications) देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्लूटूथ, एफएम रेडिओ, जीपीएस, आणि 3.5mm हेडफोन जॅकही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलिओ G37 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये केवळ 4G LTE सिमकार्ड सपोर्ट मिळणार आहे.
कॅमेरा -
फोनच्या बॅकला क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा (Moto G22 Camera Features) आहे. सोबतच 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. सोबतच 2-2 मेगापिक्सेलच्या इतर दोन लेन्सही देण्यात आल्या आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. अवघ्या दहा हजारांमध्ये चांगले फीचर्स देणारा हा बजेट स्मार्टफोन 13 एप्रिलला लाँच होतो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news