नवी दिल्ली, 5 जानेवारी : भारत सरकारची सर्वांना स्वस्त दरात LED बल्ब उपलब्ध करुन देणारी योजना 'उजाला योजने'ला (UJALA scheme) आज 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. या योजनेंतर्गत देशातील जवळपास प्रत्येक राज्यात पिवळ्या बल्बच्या जागी स्वस्त दरातील LED Bulb च्या वापरासाठी प्रोत्साहित केलं जातं. या योजनेंतर्गत लोकांना केवळ 10 रुपयांत LED बल्ब दिला जातो. बल्बशिवाय ट्यूबलाइट आणि पंखेदेखील कमी किमतीत उपलब्ध केले जातात.
2015 मध्ये लाँच झाली होती योजना -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 जानेवारी 2015 रोजी उन्नत ज्योति बाय अफोर्डेबल एलईडी फॉर ऑल (Ujala) योजना लाँच केली होती. पिवळ्या बल्बमुळे मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. हेच कमी करण्यासाठी सरकारने LED बल्बला प्रोत्साहन देत हा प्रोग्राम लाँच केला होता.
आतापर्यंत UJALA scheme अंतर्गत देशभरात 36.78 कोटीहून अधिक LED लाइट्सचं वाटप करण्यात आलं आहे. याच्या मदतीने घरोघरी वार्षिक वीज बिलात कमी आली आहे. 2014 मध्ये LED बल्बच्या किंमती अधिक होत्या. त्यावेळी LED ची 300-350 रुपये प्रति बल्ब असणारी किंमत हळू-हळू 70-80 रुपये झाली. सर्वांना स्वस्त दरात LED उपलब्ध करण्याशिवाय या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात विजेचीही बचत झाली.
Ujala Scheme अंतर्गत मिळणाऱ्या LED बल्बची किंमत 70 रुपये असते. परंतु ग्राहकांना हा बल्ब केवळ 10 रुपयांत मिळतो. त्याशिवाय LED ट्यूबलाइटची किंमत 220 रुपये आणि पंख्याची किंमत 1110 रुपये आहे.
UJALA योजनेमुळे अनेकांना स्वस्त दरातील LED Bulb मिळण्यासह, विजेच्या बचतीसह अनेकांना रोजगारही उपलब्ध झाले आहेत. आतापर्यंत जवळपास 35 हजार लोकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली. या लोकांना देशभरात LED Bulb डिस्ट्रिब्यूशनची जबाबदारी देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.