• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Aadhaar कार्ड अपडेट करायचंय? UIDAI ने दिली महत्त्वाची माहिती

Aadhaar कार्ड अपडेट करायचंय? UIDAI ने दिली महत्त्वाची माहिती

UIDAI कडून डॉक्युमेंट्सची एक लिस्ट जारी करण्यात आली आहे. आधार अपडेट करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स वैध आहेत ते यात लिस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : UIDAI ने आधार कार्ड धारकांसाठी एक आवश्यक सूचना दिली आहे. जर आधार कार्डमध्ये तुम्हाला काही अपडेट करायंच असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकेत खातं सुरू करण्यापासून ते पासपोर्ट बनवण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जातो. अशात चुकीची जन्मतारीख किंवा चुकीचा पत्ता समस्येचं कारण ठरू शकतं. त्यामुळे आधारमध्ये काही चुकीची माहिती असल्यास ती अपडेट करणं महत्त्वाचं ठरतं. UIDAI कडून डॉक्युमेंट्सची एक लिस्ट जारी करण्यात आली आहे. आधार अपडेट करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स वैध आहेत ते यात लिस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI ने आपल्या ट्विटमध्ये याबाबत माहिती दिली आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्या नावे असणं आणि ते वॅलिड असणं गरजेचं आहे. आधारमध्ये Proof Of Identity साठी 32 डॉक्युमेंट, Proof Of relationship साठी 14 डॉक्युमेंट, DOB साठी 15 आणि Proof of Address (PoA) साठी 45 डॉक्युमेंट्सचा स्वीकार केला जातो. Proof Of Relationship 1. मनरेगा जॉब कार्ड 2. पेंशन कार्ड 3. पासपोर्ट 4. आर्मी केंटीन कार्ड

  Gmail Alert! तुम्हालाही असा Email आला तर सावध व्हा, अकाउंट रिकामं होण्याचा धोका

  DOB Documents 1. बर्थ सर्टिफिकेट 2. पासपोर्ट 3. पॅन कार्ड 4. मार्क शीट्स 5. SSLC बुक/सर्टिफिकेट Proof Of Identity (PoI) 1. पासपोर्ट 2. पॅन कार्ड 3. रेशन कार्ड 4. वोटर आयडी 5. ड्राइव्हिंग लायसन्स Proof of Address (PoA) 1. पासपोर्ट 2. बँक स्टेटमेंट 3. पासबुक 4. रेशन कार्ड 5. पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट 6. वोटर आयडी 7. ड्रायव्हिंग लायसन्स 8. वीज बिल 9. पाणी बिल
  Published by:Karishma
  First published: