मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

इअरबड्सची केस पाहुनच खुश व्हाल! UBON चं क्रिकेटप्रेमींसाठी अनोखे डिझाइन

इअरबड्सची केस पाहुनच खुश व्हाल! UBON चं क्रिकेटप्रेमींसाठी अनोखे डिझाइन

UBON Earbuds: बाजारात अनेक प्रकारची उत्पादने पाहायला मिळतात. मात्र, असे काही प्रोडक्ट  आहेत जे लोकांचे लक्ष आकर्षित करतात. असेच एक उत्पादन UBON ने लाँच केले आहे.

UBON Earbuds: बाजारात अनेक प्रकारची उत्पादने पाहायला मिळतात. मात्र, असे काही प्रोडक्ट आहेत जे लोकांचे लक्ष आकर्षित करतात. असेच एक उत्पादन UBON ने लाँच केले आहे.

UBON Earbuds: बाजारात अनेक प्रकारची उत्पादने पाहायला मिळतात. मात्र, असे काही प्रोडक्ट आहेत जे लोकांचे लक्ष आकर्षित करतात. असेच एक उत्पादन UBON ने लाँच केले आहे.

मुंबई, 12 ऑगस्ट : म्युझिक ऐकण्यासाठी आता वायरलेस इअरफोन्स वापरण्याची पद्धत रूढ होते आहे. सुटसुटीत आणि कुठेही पटकन नेता येईल असं वायरलेस इअरबड्सचं (Wireless Earbuds) डिझाईन असतं. प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळ्या डिझाईन्सचे बड्स बाजारात उपलब्ध होत आहेत. UBON कंपनीनं असे एक भन्नाट वायरलेस इअरबड्स बाजारात आणले आहेत. आज तक हिंदीनं त्याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. आकर्षक डिझाईन वायरलेस इअरबड्स हे बाजारात सहज उपलब्ध असणारं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे. मात्र, खास आकर्षक डिझाईन असलेले इअरबड्स खूप कमी असतात. UBON कंपनीनं असेच आकर्षक डिझाईनचे इअरबड्स लाँच केले आहेत. इअरबड्सचं कव्हर पाहून हा क्रिकेटचा बॉल (Cricket Ball Design) आहे असं वाटू शकेल, पण ते UBON कंपनीचे इअरबड्स आहेत. BT-210 क्रिकेट बॉल वायरलेस इअरबड्सचं डिझाईन एकदम वेगळं आणि आकर्षक आहे. त्यांची किंमत 3 हजार 299 रुपये आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि UBON च्या अधिकृत वेबसाईटवर हे इअरबड्स विकत घेता येतील. ऑफलाईन बाजारातही हे बड्स आता उपलब्ध झाले आहेत. या डिव्हाईसवर 6 महिन्यांची वॉरंटी मिळते आहे. टच सपोर्ट क्रिकेट बॉलच्या आकाराच्या केसमध्ये किंवा कव्हरमध्ये इअरबड्स आहेत. या इअरबड्ससाठी 300mAh ची बॅटरी वापरण्यात आली आहे. यामध्ये ब्ल्यू टूथ v5.0 आहे. या इअरबड्समध्ये ड्युएल माईक सपोर्ट देण्यात आला आहे. केवळ टचद्वारेही तुम्ही यातील फीचर वापरू शकता. फोन उचलण्यासाठीही टच स्क्रीनचं फीचर यात उपलब्ध आहे. यात Siri आणि गुगल असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आला आहे. Nokia चा दमदार फोन, 27 दिवसांपर्यंत चालेल बॅटरी; चेक करा फीचर्स आणि किंमत क्रिकेटप्रेमींसाठी डिझाईन खास क्रिकेटप्रेमींसाठी (Cricket Lovers) या इअरबड्सचं असं डिझाईन तयार करण्यात आलंय. याची साउंड क्वालिटी खूपच छान आहे, तसंच एकदा चार्ज केल्यानंतर 20 तास याची बॅटरी चालते. यात ग्राहकांना उच्च दर्जाचा अनुभव मिळेल, असं UBON कडून सांगण्यात आलंय. हे इअरबड्स लाईटवेट असून, त्याचं डिझाईनही स्पोर्टी आहेत. ऑफलाईन मार्केट किंवा ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवर इअरबड्सच्या अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. यात स्वस्त इअरबड्सपासून प्रीमिअम दर्जाच्या महागड्या इअरबड्सपर्यंत भरपूर उत्पादनं आहेत. UBON कंपनीचे हे इअरबड्स प्रीमिअम दर्जाचे आहेत. या विभागात युनिक डिझाईन असणारी खूप कमी उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत. UBON चं क्रिकेट बॉल इअरबड्स हे त्यापैकीच एक आहे. हुबेहुब क्रिकेट बॉलसारखी दिसणारे हे इअरबड्स क्रिकेटप्रेमींना भुरळ घालतील यात शंका नाही.
First published:

पुढील बातम्या